Sharad Pawar News: 'मी मुख्यमंत्री असताना...'; मधू दंडवते जन्मशताब्दी कार्यक्रमात शरद पवारांकडून जुन्या आठवणींना उजाळा

Sharad Pawar News: 'मी मुख्यमंत्री असताना दंडवते यांनी कोकण रेल्वेविषयी चर्चा केली. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ या तीन राज्यांनी आर्थिक मदत करावी याबाबतही चर्चा झाली होती, अशी जुनी आठवण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितली.
Sharad Pawar News
Sharad Pawar Newssaam tv
Published On

रुपाली बडवे, मुंबई

Sharad Pawar News:

'मी मुख्यमंत्री असताना मधू दंडवते यांनी कोकण रेल्वेचा विषय सांगितला. त्यावेळी त्यांनी कोकण रेल्वेविषयी चर्चा केली. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ या तीन राज्यांनी आर्थिक मदत करावी याबाबतही चर्चा झाली होती, अशी जुनी आठवण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितली. ते मुंबईतील कार्यक्रमात बोलत होते. (Latest Marathi News)

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मधू दंडवते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, हुसेन दलवाई, माजी केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला आणि शेकाप नेते जयंत पाटील आणि इतर नेत्यांनी हजेरी लावली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar News
Jarange Vs Pawar: अजित पवार - जरांगे पाटील आमनेसामने, नेमकं कारण काय? मराठा आरक्षण की दुसरं काही?

मधू दंडवते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रमात शरद पवारांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार म्हणाले, ' मला आनंद आहे की, अनेक सहकाऱ्यांनी मधू दंडवते यांचा सन्मान केला. त्यांच्यासोबत अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विषयांवर काम केलं. दंडवते हे अहमदनगरचे असले तरी कोकणातील नेते झाले. १९७१ साली ते विधान परिषदेत आले. आम्ही विधानसभेतील काही लोक आवर्जून परिषदेत जाऊन त्यांची भाषण ऐकत असू'.

'कोकणातील राजापूर हा मतदारसंघ तसा अवघड…संसदेत आमचा नेता कसा बोलतो, याकडे या लोकांचं अधिक लक्ष असायचं. त्यांची भाषण ऐकून लोकांनी त्यांना निवडून दिलं, असे शरद पवारांनी सांगितलं.

'देशाचे अर्थमंत्री दंडवते यांना कार विकत घ्यायची होती. त्यावेळी त्यांनी बँकेत जाऊन अर्ज केला होता. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र, मुंबईचा संघर्ष, गोवा मुक्ती आंदोलन अशा अनेक विषयात त्यांनी लक्ष घातल होतं. त्यांचा निवडणुकीत पराभव झाला, त्यानंतर त्यांना कॅन्सर झाला. निधनपूर्वी त्यांनी लिहून ठेवलं होत की, माझ्याकडे जे काही आहे, ते मेडिकल कॅालेजला द्यावं, असे शरद पवार पुढे म्हणाले.

Sharad Pawar News
Narayan Rane News: 'नितीश कुमार आमच्यासोबत आले तर...',इंडिया आघाडीवर भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य, चर्चांना उधाण

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरद पवारांचं वक्तव्य

'पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव होऊ शकत नाही, असं काही लोक म्हणतात. पण, रस्ता निघत असतो. १९७७ साली काय परिस्थिती होती…तेव्हा कोणी चेहरा नव्हता.. तेव्हा लोकांनी चेहरा न पाहता उमेदवार निवडून दिलेत, असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com