मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जवळपास गेले तीन महिन्यापासून आंदोलन उपोषण करत आहेत. आता आरक्षण नाही तोवर माघार नाही म्हणून जरांगे पाटलांनी आपला मोर्चा मुबंईच्या दिशेने वळवला आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात संविधानावरून चांगलीच जुंपली आहे.
मराठा समाजाला आरक्षण द्याव या मागणीसाठीच्या आंदोलना दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यापासूनच जवळीक साधली नाही. आंदोलना दरम्यान अजित पवार यांनी आरक्षणावर ना कुठली प्रतिक्रिया दिली ना जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मात्र आता जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा मुबंईच्या दिशेने वळवल्यानंतर अजित पवार यांनी विनंती करत काय म्हटलं आहे की, आरक्षण बाबत घटना घडायला लागल्यानंतर सरकार ला जे जे पावल उचलायची आहेत, ती उचलली आहेत. काही गोष्टीला विलंब लागतो. एखादी गोष्ट कायद्याच्या नियमाच्या चौकटीत बसवायची असल्यास तज्ञ वकिलांशी चर्चा करावी लागते, माग ज्या घटना घडल्या चुका झाल्या आरक्षण देताना त्याची काळजी घ्यावी लागते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यांची काळजी घ्यावी लागते. (Latest Marathi News)
पवार म्हणाले, हे सगळं मुख्यमंत्री विश्वासात घेऊन करत आहेत. काम गतीने करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. सगळं सुरू असताना हे आजच झालं पाहिजे, इतक्याच तारखेला झालं पाहिजे, असं हट्ट कुठल्याही नागरिकांनी राज्यातल्या धरता काम नये, असं म्हणत नाव न घेता जरांगे पाटील यांच्यावर टीका केलीय. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, शेवटी आपण सगळे संविधानाचा आदर करतो, कायदा घटनेचा आदर करतो.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी, अशी मागणी जरांगे पाटलांनी सरकारकड केली आहे. सरकार गेले तीन महिन्यापासून जरांगे पाटील यांना आश्वसन देत आहे. त्यामुळे आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधान कायदेशीर बाबत बोलताना ते फक्त आमच्यासाठीच आहे. सरकारला याच काही नाही, असा टोला जरांगे यांनी लगावला आहे. या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनोज जरांगे पाटील यांच्या शाब्दिक चकमक उडालेली पाहायला मिळत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.