मराठा आरक्षणासाठी शासन सकारात्मक आहे. मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या कक्षेत बसणारे आरक्षण देण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच ओबीसी व इतर कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. शाश्वत आणि कायद्याच्या चौकटीत टिकेल, असे आरक्षण मराठा समाजाला मिळावे ही शासनाची भूमिका आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मुंबई महानगरात संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबवण्यात येत असून या मोहिमेंतर्गत आज कुर्ला परिसरातील अनेक मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
मराठा समजला आरक्षण मिळावं म्हणून वेगवेगळ्या आघाड्यांवर शासन काम करत आहे. यासर्व गोष्टींचा विचार करता मराठा आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केले. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुंबई महानगरात संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबवण्यात येत असून या मोहिमेंतर्गत आज कुर्ला परिसरातील अनेक मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेमध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. मुंबईत राबवण्यात येत असलेल्या संपूर्ण स्वच्छता (DEEP CLEAN) मोहिमेमुळे मुंबई शहरातील प्रदूषणाची पातळी घटली असून प्रदूषणाची पातळी ३५० वरून १०० ते ८- पर्यंत खाली आली आहे. हे या संपूर्ण स्वच्छता मोहिमेचे यश आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. (Latest Marathi News)
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संपूर्ण स्वच्छता मोहीम ही एक लोकचळवळ झाली आहे. टप्प्या- टप्प्याने संपूर्ण स्वच्छता मोहीम राज्यात राबवण्यात येत असून या मोहिमेच्या माध्यमातून लवकरच स्वच्छ, सुंदर व हरित महाराष्ट्र होण्यास मदत होणार आहे. या अभियानामध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे.
२२ जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्याला देशातील सर्व नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे संपूर्ण स्वच्छता मोहिमेला गती मिळाली आहे. मुंबईतही अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. आज कुर्ला येथील अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेचे खरे हिरो हे स्वच्छता कर्मचारी आहेत. दिवस-रात्र हे कर्मचारी मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी काम करत असल्याचेही सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.