खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाममध्ये सुरू आहे. आसाम सरकारचा या यात्रेला विरोध असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून वारंवार केला जात आहे. अशातच आता सर्वात मोठी बातमी समोर आली नसून आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा काढत आहे. ही यात्रा सध्या ईशान्य भारतात सुरू आहे. या यात्रेला आसाम सरकार परवानगी देत नाही तसेच यात्रेत सहभागी होणाऱ्या लोकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून होत आहे.
अशातच आता माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी आसाममध्ये भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. याबद्दलचे ट्वीट त्यांनी आपल्या एक्स अकांऊटवरुन केले आहे. सोबतच व्हिडिओही शेअर केला आहे. जो सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जयराम रमेश यांचे ट्वीट..
"काही वेळापूर्वी सुनीतपूरच्या जुमुगुरिहाटमध्ये भाजपच्या लोकांनी माझ्या कारवर हल्ला केला आणि गाडीच्या विंडशील्डवरील भारत जोडो न्याय यात्रेचे स्टिकर्सही फाडले. हल्लेखोरांनी स्टिकरवर पाणी फेकले आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या विरोधात घोषणा दिल्या," असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.
तसेच "आम्ही संयम राखला, गुंडांना माफ केले आणि तेथून पटकन पुढे निघालो. निःसंशयपणे, हे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा करत आहेत. पण आम्ही घाबरलो नाही आणि लढत राहू, असेही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, या घटनेबाबत अद्याप भाजपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.