Manoj Jarange Wax Statue: मनोज जरांगेंचा मेणाचा पुतळा अवघ्या ३ महिन्यांत साकारला; मावळच्या तरुणाची कलाकृती बघून थक्क व्हाल; VIDEO

Manoj Jarange Wax Statue: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील लढत आहेत. दिवसरात्र एक करत आहेत. त्यामुळे त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून त्यांच्या लोकप्रियतेतही वाढ झाली आहे. दरम्यान त्यांच्या या आंदोलनामुळे भारावून गेलेलेल्या मावळ तालुक्यातील एका तरुणाने त्यांचा मेणाचा पुतळा उभारला आहे.
Manoj Jarange Wax Statue
Manoj Jarange Wax StatueSaam Digital

Manoj Jarange Wax Statue

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील लढत आहेत. दिवसरात्र एक करत आहेत. त्यामुळे त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून त्यांच्या लोकप्रियतेतही वाढ झाली आहे. दरम्यान त्यांच्या या आंदोलनामुळे भारावून गेलेलेल्या मावळ तालुक्यातील एका तरुणाने त्यांचा मेणाचा पुतळा उभारला आहे. पुण्यातील एकविरा कार्ला येथील वॅक्स मूजियममध्ये हा पुतळा उभारण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आला असून पाच फूट सात इंच इतकी उंची असलेला हा पुतळा अवघ्या तीन महिन्यात उभारण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगेंनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे ते आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस दिवस असून आज सायंकाळी ते पुणे जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील त्यांचा शेवटचा मुक्काम लोणावळा येथे होणार आहे. तसेच, लोणावळ्यात मुक्काम असल्याने जरांगे पाटील हे वॅक्स मूजियमला भेट देणार असल्याचं लोणावळा सकल मराठा विभाग प्रमुख भाऊ हुलावळे, आणि किरण गायकवाड यांनी सांगितलं आहे. पुतळ्याची जरांगे यांच्याकडून यावेळी पाहणी केली जाणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Wax Statue
Maratha Survey: महाराष्ट्रातही बिहारसारखा पॅटर्न वापरा, मराठा सर्वेक्षणावरून संभाजीराजे यांचं मोठं वक्तव्य

कार्ला येथील अशोक म्हाळसकर आणि ऋषी म्हाळसकर या बाप लेकांनी हा मेणाचा पुतळा तयार केला आहे. यासाठी त्यांना तीन महिन्यांचा वेळ लागला. मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आला असून, पुतळ्याची उंची पाच फूट सात इंच इतकी आहे. तर, हुबेहूब जरांगे पाटील साकारण्याचा प्रयत्न म्हाळसकर कुटुंबीयाने केलाय. त्यामुळे, हा पुतळा पाहण्यासाठी अनेक मराठा तरुण कार्ला येथे येत आहेत.

Manoj Jarange Wax Statue
Bhandara News : शैक्षणिक मागण्यांसाठी स्वाक्षरी मोहीम; दोन महिने राबविले जाणार अभियान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com