Bhandara News : शैक्षणिक मागण्यांसाठी स्वाक्षरी मोहीम; दोन महिने राबविले जाणार अभियान

Bhandara News : ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने संपूर्ण देशभरात २३ जानेवारी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीपासून तर २३ मार्च शहीद दिनापर्यंत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन हस्ताक्षर मोहीम राबविण्यात येत आहे.
Bhandara News
Bhandara NewsSaam tv

शुभम देशमुख 

भंडारा : विद्यार्थ्यांच्या मागण्या घेऊन ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने मोहीम हाती घेतली आहे. प्रामुख्याने (Bhandara) नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती करावी या मागण्या घेऊन स्टुडंट्स फेडरेशनने स्वाक्षरी मोहीम राबविण्यास सुरवात (Student) केली आहे. भंडाऱ्यात देखील या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

Bhandara News
Ulhasnagar crime : पूर्ववैमनस्यातून दोन जणांवर जीवघेणा हल्ला; उल्हासनगरमध्ये रात्रीची घटना

ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने संपूर्ण देशभरात २३ जानेवारी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीपासून तर २३ मार्च शहीद दिनापर्यंत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन हस्ताक्षर मोहीम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (School) शाळा- महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेत त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bhandara News
Nanded News : नांदेडमध्ये तीन कारच्या काचा फोडल्या; महिनाभरातील तिसरी घटना

या आहेत मागण्या 

नवीन (Education) शैक्षणिक धोरण २०२० रद्द करा, शिक्षण ही बाब राज्य सूचीमध्ये समाविष्ट करा, CUET व NEET परीक्षा रद्द करा, सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी संघाच्या निवडणुका सुरू करा आणि सर्व शैक्षणिक संस्थामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती झाली पाहिजे. महाराष्ट्र राज्यातील ६२ हजार सरकारी शाळा व समूह शाळा योजना बंद करा, तसेच महाराष्ट्र राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफी झाली पाहिजे. महाराष्ट्र राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मंजूर ७२ वसतीगृहांचे काम तात्काळ सुरू करावे. शाळा महाविद्यालय तेथे एसटी सुरू करून मोफत प्रवास मिळाला एससी- एसटी विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्तामध्ये वाढ झाली पाहिजे; अश्या विविध मागण्याला घेऊन ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com