Traffic changes for Khandoba Yatra Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: खंडोबाची सोमवती यात्रा ३० डिसेंबरला, वाहतुकीत मोठे बदल; या पर्यायी मार्गाचा करा वापर

Khandoba Somvati Yatra 2024: खंडोबाची सोमवती यात्रा येत्या ३० डिसेंबरला होणार आहे. या यात्रेनिमित्त वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. हे बदल लक्षात घेऊन वाहन चालकांनी प्रवास करावा.

Priya More

पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा येत्या ३० डिसेंबरला होणार आहे. श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये, तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत.

वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ३० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहे. सोमवती अमावस्या यात्रेकरीता येणारी हलकी आणि इतर वाहने वगळून जड-अवजड वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतूक बदल:

सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे येणारी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने नीरा- मोरगाव- सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुणेकडे वळविण्यात येत आहे.

पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतूक बेलसर- कोथळे- नाझरे- सुपे- मोरगाव रोड मार्गे बारामती किंवा फलटण या मार्गे वळविण्यात येत आहे.

सुपा पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतूक बदल:

बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी वाहनांची वाहतूक बंद करुन ती मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुणेकडे वळविण्यात येत आहे.

सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतूक बदल:

पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजुकडे जाणारी वाहनांची वाहतूक पुर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे-वीर-वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे.

वाहतुकीस लावलेले निर्बंध ३० डिसेंबर रोजीच्या 'श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रे'करीता येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी शिथील राहतील. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वाहतुकीमध्ये केलेल्या बदलाची दखल करून प्रवास करावा आणि सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT