Pune Crime Samm Tv
मुंबई/पुणे

Pune News: ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, २२ वर्षीय इंजिनिअरचा घाबरून मृत्यू; पुण्यात खळबळ

Pune Crime: पुण्यात आयटी इंजिनिअरने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून उडी मारत त्याने आयुष्य संपवलं.

Priya More
  • पुण्यातील आयटी इंजिनिअरची आत्महत्या

  • खोट्या ड्रग्स केसची धमकी दिल्याने उचलले टोकाचे पाऊल

  • खराडीतील इंजिनिअरच्या मृत्यूप्रकरणी वडिलांची पोलिसांत तक्रार

  • इंजिनिअर मृत्यू प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये आयटी इंजिनिअर तरुणाने २७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पुण्यातील खराडी परिसरात ही घटना घडली. ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केल्यामुळे तणावाखाली येऊन आयटी इंजिनिअरने टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवलं. शिखर कुमार गौरव सक्सेना असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. आयटी इंजिनिअरच्या आत्महत्येमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

शिखर कुमार गौरव सक्सेना हा तरुण पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करत होता. खराडी परिसरातील रिव्हरडेल सूट या इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून उडी मारत त्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पण शिखर कुमारच्या मृत्यूमागील कारणांबाबत वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला वेगळं वळण आले. त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अजय कुमार भाटिया नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखर कुमार २९ सप्टेंबरला घरातून बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेण्यात आला पण तो सापडला नाही. तसंच त्याचा फोन बंद लागत होता. त्यानंतर त्याच्या बेपत्ता होण्याबाबत खराडी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खराडी पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पण शिखर कुमारच्या वडिलांनी त्याच्या आत्महत्येमागचे धक्कादायक कारण सांगितले.

शिखर कुमार हा मुळचा उत्तराखंडचा होता. त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याच्या वडिलांनी पुण्यातील खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अजय कुमार भाटिया नावाची व्यक्ती शिखरला वारंवार फोन करून धमकी देत होता. ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तो शिखरकडे पैशांची मागणी करत होता. यामुळे शिखर मानसिक तणावात होता. याच त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात आंदोलनाच्या ५५ तासांनंतर जिल्हा प्रशासनाला जाग

Diwali 2026 : दिवाळीच्या फराळात वापरला जाणारा खवा शुद्ध की भेसळयुक्त? कसे ओळखाल

सर्वाधिक गोल करणाऱ्या 'किंग'चा फुटबॉलला अलविदा; रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती,चाहत्यांना अश्रू अनावर

MSRTC Employees diwali bonus 2026 : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात; एकाच वेळी बोनस, अॅडव्हान्स आणि महागाई भत्त्याची घोषणा

Train Travel Rules: प्रवासात बॅग ट्रेनमध्ये विसरलात? घाबरू नका, 'या' सोप्या पद्धतीने परत मिळेल तुमचे सामान

SCROLL FOR NEXT