Pune water cut : पुणेकरांना मोठा धक्का! आजपासून दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद; महापालिकेचा निर्णय

Pune water cut today : पुणे महापालिकेने दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. बांधकामासाठी पिण्याच्या पाण्यावरील निर्बंध लावण्यात आले आहेत.
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?
Pune Water Cut UpdateSaam Tv
Published On: 

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune water supply closed every Thursday : यंदा पावसाने हुलकावणी दिली आहे. दरवर्षीपेक्षा कमी पाऊस पडला आहे, त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन पुणे महापालिकेने मोठा आणि कडक निर्णय घेतला आहे. आजपासून पुणे शहरात आठवड्यातून एक दिवस (गुरुवार) पाणीकपात लागू करण्यात आली आहे. आता दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. यामुळे पुणेकरांना आता पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी जपण्याचे नियोजन

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत सध्या २५.७० टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसातील खंड, पाण्याची वाढती मागणी आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेने ठरवले आहे. तसेच राज्य सरकारनेही १६ ऑक्टोबरपासून किमान १० टक्के पाणीवापर कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! सप्टेंबरचा ₹१५०० चा हप्ता कधी येणार? आज होणार निर्णय, महत्त्वाची अपडेट

नियोजनाचा नागरिकांवर कसा परिणाम होणार?

दर गुरुवारी: संपूर्ण पुणे शहरात पाणीपुरवठा बंद राहील.

शुक्रवार आणि शनिवार: पाणीपुरवठा पूर्ववत होण्यास काहीसा वेळ लागू शकतो किंवा काही भागात कमी दाबाने पाणी येऊ शकते.

कडक नियम: बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली असून, वाहन धुण्याच्या केंद्रांवरही (सर्व्हिस सेंटर) बंदीचे निर्देश देण्यात आले आहेत. पाचीची नासाडी रोखण्यासाठी महापालिका कडक पावले उचलणार आहे.

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?
Maharashtra Weather : राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान, 'या' दिवशी कोसळणार मुसळधार; हवामान खात्याचा मोठा इशारा

ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त गावांना दिलासा

एका बाजूला शहरात पाणीकपात सुरू असताना, दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने पावले उचलली आहेत. सध्या जिल्ह्यातील ५ गावे आणि ५३ वाड्यांना ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, यामुळे सुमारे १८ हजार ६५० नागरिकांना दिलासा मिळाला आहे. प्रामुख्याने बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यांमध्ये टँकर सुरू आहेत. तसेच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात २९४ नवीन बोअरवेल योजनांनाही मान्यता देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com