IAS Pooja Khedkar Saam Digital
मुंबई/पुणे

IPS Pooja Khedkar: मालक सापडला, पण कार गायब; IAS पूजा खेडकर यांची ऑडी कुठे गेली?

Priya More

अक्षय बडवे, पुणे

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या ज्या कारमुळे वाद रंगला आहे तिच ऑडी कुठे गेली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पूजा खेडकर यांच्या पुण्यातील बंगल्यातून ऑडी कार हलवण्यात आली आहे. बाणेर येथील त्यांच्या बंगल्याबाहेर पार्किंमध्ये ऑडी कार झाकून ठेवण्यात आली होती. पण गुरूवारी पुणे पोलिसांनी (Pune Police) नोटीस बजावल्यानंतर आज ऑडी कार बंगल्यातून हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही ऑडी कार नेमकी कुठे हलवली याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याच ऑडी कारवर लाल दिवा लावून पूजा खेडकर जिल्हाधिकारी कार्यलयात जात होत्या. याशिवाय पूजा खेडकर यांच्या बंगल्याबाहेर असणारी दुसरी पजेरो कारही हलवण्यात आली आहे.

पूजा खेडकर यांच्या ऑडी कारबाबत आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकर वापरत असलेली ती ऑडी कार थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या मालकीची आहे. या कंपनीचा मूळ मालक हे मनोरमा खेडकर यांच्या सोबत एका कंपनीमध्ये संचालक म्हणून काम करत होते. मनोरमा खेडकर या पूजा खेडकर यांच्या आई आहेत. डिलिजन्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नाव आहे. ही कंपनी मनोरमा खेडकर यांच्या नावावर आहे.

पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेचे पथक बाणेर रोडवर असलेल्या बंगल्याची पाहणी करणार आहेत. बाणेर रोडवर पूजा खेडकर यांचा बंगला आहे. पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून या बंगल्याची पाहणी करण्यात येणार आहे. अनाधिकृत बांधकाम आढळून आल्यास महापालिका या बंगल्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. यासाठी पूजा खेडकर यांच्या बंगल्याबाहेर बुलडोझर आणि जेसीपी आणण्यात आला आहे.

दरम्यान, वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या अडचणी वाढणार आहेत. पूजा खेडकर यांनी पुणे पोलिसांच्या नोटीसीला उत्तर दिले नाही तर पोलिस कोर्टात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांच्याविरोधात पुणे पोलिस कोर्टात खटला दाखल करणार आहेत. पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी कारला लाल दिवा लावल्याप्रकरणी आणि महाराष्ट्र शासनाची पाटी लावल्यामुळे पुणे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. वॉट्सअॅपवर पाठवलेल्या नोटीसीला पूजा खेडकरकडून अद्याप उत्तर नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

SCROLL FOR NEXT