Pune Khadakwasla Dam Water Level Latest Update  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Dam Water Storage: पुणेकरांसाठी आनंदवार्ता! खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात २४ तासांत मोठी वाढ, वाचा ताजी आकडेवारी

Pune Dam Water Level Latest Update: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्याचा पाणीप्रश्न मिटला आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील अनेक धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे प्रमुख शहरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. अशामध्ये पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात गेल्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमधील पाणीसाठ्यात २४ तासांत कमालीची वाढ झाली आहे. पुणे शहराला महिनाभर पाणी पुरेल एवढा पाणीसाठा खडकवासला धरण साखळी प्रकल्पामध्ये २४ तासांत जमा झाला आहे.

गेल्या २४ तासांत खडकवासला धरणात १.४५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे आता पुणे शहराचा पाणीप्रश्न मिटला आहे. पुणे शहरावर असलेले पाणी कपातीचे संकट आता दूर झाले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच या चारही धरणांमध्ये एक महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली होती. पण आता जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे पुण्याचा पाणी प्रश्न मिटला आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा -

  • खडकवासला - ५३.१२ टक्के

  • पानशेत - ३९.७८ टक्के

  • वरसगाव - २५.८१ टक्के

  • टेमघर - २२.७७ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT