Kojagiri Poornima 2024 Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: कोजागिरी पौर्णिमेला पुण्यातील उद्यानांच्या वेळेत वाढ, रात्री १२ वाजेपर्यंत राहणार उघडी

Kojagiri Poornima 2024: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील उद्याने सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४.३० ते रात्री १२ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येणार आहेत.

Priya More

सचिन जाधव, पुणे

कोजागिरी पौर्णिमा पुणेकर मोठ्या उत्साहाता साजरी करत असतात. पौर्णिमेचा आनंद लूटण्यासाठी शहरातील पुणे महापालिकेच्या उद्यानांच्या वेळेमध्ये वाढ करण्यात आली आहे. हे उद्याने सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४.३० ते रात्री १२ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पुणे महानगरपालिका हद्दीमधील उद्यानांच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक उद्याने, बागा मनोरंजनासाठी मोकळ्या जागांची तरतूद करणे, नागरिकांच्या मनोरंजनासाठी उद्याने, बागा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. पुणे महानगरपालिका अधिकारी क्षेत्रामध्ये एकूण १५ क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीअंतर्गत उद्यान विभागामार्फत एकूण २११ उद्याने, मत्सालय आणि प्राणी संग्रहालय विकसित करण्यात आलेली आहे.

उद्यानांचे विकसन, सुशोभिकरण, देखभाल, देखरेख व दुरुस्ती विषयक कामे उद्यान विभागामार्फत करण्यात येतात. उद्यानांमध्ये नागरिक, लहान मुलं, परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी 'कोजागिरी पौर्णिमा' असून पुणे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उद्यानांमध्ये भेट देत असतात. शहरातील सर्व नागरिकांना सालाबादप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उद्याने रात्री १२ पर्यंत उघडी ठेवली जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idli Chutney Recipe: इडलीची चटणी खूप पातळं होतेय? मग ही खास स्टेप एकदा नक्की फॉलो करा

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shirur News : फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट न केल्याने भयानक कृत्य; टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

Dussehra Apatya Leaves: दसऱ्याला आपट्याची पाने वाटण्यामागे शास्त्र काय आहे?

Kalsubai Fort History: इतिहास, वास्तुकला आणि ट्रेकिंगसाठी खास! वाचा कळसुबाई किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT