हिंदू कॅलेंडरनुसार, शरद पौर्णिमा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा शरद पौर्णिमा 28 ऑक्टोबरला आहे. याला रास पौर्णिमा, कोजागरी पौर्णिमा असेही म्हणतात.
शरद पौर्णिमेबाबत अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत. काही मान्यतेनुसार, असे म्हटले जाते की या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि तिच्या भक्तांना सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते. शरद पौर्णिमा तिथी मनोकामना पूर्ण करणारी मानली जाते. या दिवशी पूजेसोबत काही उपाय केल्याने जीवनात (Life) आनंद मिळतो. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पूजेव्यतिरिक्त, या शुभ प्रसंगी लोक (People) विशेष संदेशाद्वारे आपल्या प्रियजनांना शरद पौर्णिमेच्या शुभेच्छा देतात. येथे काही संदेश आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकता.
मंद प्रकाश चंद्राचा त्यात गोड (Sweet)
स्वाद दुधाचा विश्वास वाढू दे नात्याचा
त्यात असुद्या गोडवा साखरेखा.
हार्दिक शुभेच्छा!
प्रकाश चंद्रमाचा, आस्वाद दुधाचा,
साजरा करू य सण कोजागिरीचा.
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
केशरयुक्त दुधाची चवदार साथ,
ठेवू दुधाला शीतल चंद्रप्रकाशात,
म्हणूया देवीचे श्रीयुक्त महान,
दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात.
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!
चांदण्यात न्हावून निघाली चांदरात,
कोजागिरीच्या चंद्राचा पसरला
रुपेरी प्रकाश….
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!
शरदाचं टिपुरं चांदणं, कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात,
करू जागरण एकत्र
मसाले दूधाचा गोडवा,
नात्यांमध्ये येऊ दे
आनंदाची उधळण,
आपल्या जीवनातही होऊ दे
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
चांदण्यांच्या संगतीने चंद्र करी
रासलीला, मुग्ध धरती सारी
रंगली पाहून त्यांना…
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!
हा चंद्र तुझ्यासाठी
ही रात्र तु्झ्यासाठी
आरास ही ताऱ्यांची
गगनात तुझ्याचसाठी
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !
लिहून झाली कविता तरी,
वाटते त्याला अधुरी आहे,
कोजागिरीचा चंद्र पाहिल्याशिवाय
आज रात्र अपूरी आहे.
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरीची आज रात, पूर्ण
चंद्रमा नभात, चमचमत्या ताऱ्याची
वरात, चंद्राची शितलता मनात,
मंद प्रकाश अंगणात,
आनंद तराळला मनामनात…
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरीचे चांदणे, हसतंय
माझ्या अंगणात, दुग्धशर्करा
योग यावा, जसा साऱ्यांचा
जीवनात!
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.