Sakshi Sunil Jadhav
किसलेलं खोबरं, चणा डाळ, मिरच्या, आलं, मीठ, पाणी, कढीपत्त्याची फोडणी इ.
सर्व साहित्य एकत्र करून ठेवा. चणा डाळ आधीच तव्यावर मध्यम आचेवर १–२ मिनिटे भाजून घ्या.
किसलेले खोबरं थोडं 1–2 मिनिटे सुकं भाजून घ्या.
मिक्सरमध्ये ताजं खोबरं, भाजलेली चणा डाळ, हिरव्या मिरच्या, आलं, कढीपत्ता आणि मीठ टाका.
थोडं थोडं पाणी घालून गुळगुळीत वाटा. साधारण 4–6 टेबलस्पून पाणी लागू शकतं.
छोट्या कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर मोहरी, उडीद डाळ, सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून परतून घ्या.
गरम फोडणी थेट मिक्स केलेल्या चटणीवर ओता. ह्या फोडणीमुळे हॉटेल सारखा सुगंध आणि क्रंच येतो.