Sakshi Sunil Jadhav
दसऱ्याला वरण भात न करता तुम्ही हॉटेल स्टाईल बासमती पुलाव सोप्या पद्धतीने तयार करु शकता.
बासमती तांदूळ, चिरलेल्या भाज्या, कांदा, टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, तेल, पाणी, पीठ, मीठ, गरम मसाला, बिर्याणी मसाला, हळद, हिरवी मिरची आणि खडे मसाले इ.
बासमती तांदूळ धुऊन ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
कढईत तेल गरम करून त्यात तमालपत्र, लवंग, दालचिनी, वेलची टाकून परतून घ्या.
त्यात बारीक चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परता. नंतर आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, टोमॅटो टाकून परता.
हळद, मीठ, गरम मसाला, बिर्याणी मसाला टाकून मिक्स करा. त्यात गाजर, मटार, शेंगा अशा चिरलेल्या भाज्या घाला आणि थोडे परता.
भिजवलेला तांदूळ निथळून टाकून भाज्यांसोबत हलक्या हाताने मिक्स करा. नंतर दुप्पट पाणी घालून झाकण ठेवून शिजवा.
पुलाव शिजल्यावर हलक्या हाताने ढवळून घ्या. वरून तूप, कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.