Pune News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात मद्यधुंद अवस्थेत महिलेचा राडा, नशेत नदीपात्रात उडी मारणार तेवढ्यात...

Pune News : मद्यधुंद अवस्थेतील एका महिलेने पुण्यात राडा घातला. नशेत असलेल्या महिलेने नदीमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे.

Yash Shirke

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यात दारु पिऊन एका महिलेने राडा घातल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील नदीपात्रात ही महिला मद्यधुंद अवस्थेत राडा घालत असल्याचे स्थानिकांनी पाहिली. त्यांनी ही माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले. तब्बल पंधरा मिनिटे महिलेने गोंधळ घातला होता.

पुण्यातील नदीत उतरण्याचा एका महिलेने प्रयत्न केला. ही महिला मद्यधुंद अवस्थेत होती. नशेमध्ये ती नदीमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. मला माझी आई बोलावत आहे, असे म्हणत ती नदीत उडी मारणार होती. ही महिला पूर्णपणे नशेत असून तिने मी मुंब्रा येथील रहिवासी असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती समोर आली आहे.

दारु पिऊन ही महिला पंधरा-वीस मिनिटे नदीपात्रात राडा घालत होती. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. मद्य धुंद अवस्थेतील महिलेला शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी नशेत गोंधळ घातल्याप्रकरणी या महिलेवर कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

पुण्यात भीषण अपघात

पुण्यातील भोर परिसरात एसटी बसच्या अपघाताची घटना समोर आली आहे. दुर्गम दुर्गाडी मार्गावर एसटी आगाराची बस साईड पट्टीवरून घसरून थेट गटारात पलटी झाली. या अपघातात बसमधील प्रवाशांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यातील ही गटारात पलटी होणारी तिसरी एसटी बस आहे, त्यामुळे एसटी प्रशासनाच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Puri Tips: पुऱ्या फुगत नाहीत, तळल्यावर लगेच तेलकट अन् चपट्या होतात? 1 पदार्थ वापरा, टम्म फुगतील पूऱ्या

Local Body Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडणार, आज फैसला होणार?

Maharashtra Live News Update : लोणावळा रेल्वे मार्गावर १० दिवस ब्लॉक

Khandvi Recipe: नाश्त्याला झटपट बनवा गुजराती स्टाईल खांडवी, मिनिटात होईल फस्त

Kankavli Politics : आमदार निलेश राणे संदेश पारकरांच्या घरी, मंत्री उदय सामंत उपस्थित

SCROLL FOR NEXT