Pune Drunk And Drive Case Saam TV
मुंबई/पुणे

Pune Traffic Rule: पुणेकरांनो सावधान! दारू पिऊन वाहन चालवणं पडणार महागात, लायसन्स कायमस्वरूपी होणार रद्द

Pune News | Action Against Drunk And Drive Case: पुण्यात यापुढे दारू पिऊन वाहन चालवणं पुणेकरांना महागात पडणार आहे. कारण दारू पिऊन कार किंवा बाइक चालवल्यास वाहन चालकांचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द होण्याची शक्यता आहे.

Priya More

नितीन पाटणकर, पुणे

पुणेकरांसाठी (Punekar) महत्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनची प्रकरणं (Pune Hit And Run Case) खूपच वाढली आहेत. यावरून आता पुणे वाहतूक पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. यापुढे दारू पिऊन वाहन चालवणं पुणेकरांना महागात पडणार आहे. दारू पिऊन कार किंवा बाइक चालवल्यास वाहन चालकांचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द होण्याची शक्यता आहे अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात आता चांगलीच कारवाई होणार आहे. पहिल्या वेळेस दारू पिऊन वाहन चालविल्यास तीन महिन्यासाठी चालकाचे लायसन्स रद्द केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या वेळेस देखील दारू पिऊन वाहन चालविल्यास सहा महिन्यासाठी चालकाचे लायसन्स रद्द केले जाणार आहे. तर तिसऱ्या वेळेस जर दारू पिऊन पुन्हा वाहन चालवल्यास चालकाचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द होऊ शकते.

पुण्यातील बहुचर्चित कल्याणी नगर कार अपघात प्रकरण, रविवारी पुण्यातील बोपोडी या ठिकाणी झालेले हिट अँड रन प्रकरण आणि फरसखाना पोलिस स्थानकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांना दारू पिऊन पेटवून देणाचा प्रयत्न करण्याच्या वाहन चालकाच्या धक्कादायक प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या पुढे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे.

यापूर्वी पुण्यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात सौम्य स्वरूपाची कारवाई होऊन त्यावर न्यायालयाकडे खटला पाठवला जायचा. पण आता दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या पुणेकरांवर चांगलीच कारवाई केली जाणार आहे. पुणे पोलिस या सगळ्याची अंमलबजावणी कठोर पद्धतीने करणार असून त्यांचे लायसन रद्द करण्याचा प्रस्ताव न्यायालयाकडे पाठवणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT