Tragic end in Junnar: Talathi Ramesh Suryawanshi and student Priyanka Kale found dead in 1200-foot gorge at Konkan Kada. Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Pune : जुन्नरमध्ये खळबळ! १२०० फूट खोल दरीत मृतदेह आढळले, तलाठी अन् कॉलेज तरुणीचा समावेश

Junnar valley deaths investigation : पुण्यातील जुन्नरजवळ १२०० फूट खोल दरीत तलाठी आणि कॉलेज तरुणीचे मृतदेह आढळले. आत्महत्या की खून? पोलिस तपास सुरू असून मृत्यूचे कारण पोस्टमार्टमनंतर समजणार आहे. घटनेने खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

Talathi and student found dead in Pune Junnar valley : पुण्यातील जुन्नरजवळच्या १२०० फूट खोल दरती दोन मृतदेह आढलल्यानंतर एकच खळबळ उडाली. दुर्गम आदिवासी भागात असलेल्या कोकणकडा परिसरात तरूणी आणि एका व्यक्तीचा मृतदेह आढळला असून, या घटनेची संपूर्ण चर्चा होतेय. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतांमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याचा आणि एका तरुणीचा समावेश आहे, ज्यामुळे या प्रकरणाने गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे.

मृत व्यक्तींची ओळख श्रीगोंद्यात तलाठी म्हणून कार्यरत असलेले ४० वर्षीय रमेश सूर्यवंशी आणि आंबोली (ता. जुन्नर) येथील २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी रूपाली अशी आहे. जुन्नर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गायकवाड यांनी या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली. पोलिस आणि स्थानिक बचाव पथकाने अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत दरीत उतरून मृतदेह बाहेर काढले.

सूत्रांनुसार, रमेश सूर्यवंशी मूळचे दुर्गावाडीचे रहिवासी होते. सध्या ते श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता होते, याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. दुसरीकडे रूपाली देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या बेपत्त्याबाबत जुन्नर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होता.

स्थानिक रहिवाशांना कोकणकडा परिसरातील रिव्हर्स वॉटर फॉलजवळ काही दिवसांपासून एक पांढरी कार उभी असल्याचे दिसले. संशय बळावल्याने त्यांनी परिसराची पाहणी केली असता, कड्याच्या काठावर एक पुरुष आणि एक स्त्री यांच्या चपला आढळल्या. रविवारी (22 जून) दाट धुके आणि पावसामुळे शोधकार्याला अडथळा आला. सोमवारी (23 जून) सकाळी बचाव पथकाने दरीत उतरून शोध घेतला, तेव्हा दोन्ही मृतदेह आढळले. बचाव पथकाचे सदस्य अमोल पाटील, सचिन जाधव आणि पोलिस कर्मचारी संतोष गव्हाणे, विजय पवार यांनी मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी सरकारी रग्णालयात पाठवले आहेत.

रमेश आणि प्रियंका यांनी आत्महत्या केली, की त्यांचा खून करण्यात आला. याबाबतचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत्यूचे कारण समजणार आहे. पोलिसांकडून आजूबाजूला चौकशी केली जात आहे. मृत्यूचे कारण आणि दोघांमधील संबंध याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey: मोदी हे भाजपची मजबुरी; नरेंद्र मोदींशिवाय भाजप 150 जागाही जिंकणार नाही; खासदाराच्या विधानानं खळबळ

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची हॉटेलमध्ये भेट, अर्धा तास गुप्त चर्चा?

Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

Hindi Marathi Language Controversy : 'दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे'; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार? VIDEO

Tourists Boat capsized: मोठी बातमी ! पर्यटकांनी भरलेली बोट उलटली, ३४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT