Pune News Saam Digital
मुंबई/पुणे

Pune News : विद्यार्थिनीच हॉस्टेलमधील मुलींचे व्हिडिओ काढून पाठवत होती बॉयफ्रेंडला; पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजमधील घटनेने खळबळ

Pune Crime News : पुण्यातील प्रसिद्ध इंजिनिअरींग कॉलेजच्या होस्टेलमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. हॉस्टेलमधील विद्यार्थिनींचे चोरून व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते.

Sandeep Gawade

पुण्यातील प्रसिद्ध इंजिनिअरींग कॉलेजच्या होस्टेलमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. हॉस्टेलमधील विद्यार्थिनींचे चोरून व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते. धक्कादायक म्हणजे एक विद्यार्थिनींनीच या प्रकारात सामिल असल्यामुळे खळबळ उडाली आहे. या विद्यार्थिनीवर आणि तिचा मित्र विनीत सुराणा यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विद्यार्थीनीला डीबार केलं असल्याचं कॉलेज प्रशासनाने म्हटलं आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने हॉस्टेलमध्ये विद्यार्थीनींचे चोरून व्हिडीओ शूट केले. ते व्हिडीओ ती तीचा मित्र विनीत सुराणा याला पाठवायची. विद्यार्थीनींचे या व्हिडीओचा दोघांनी गैरवापर केल्याची प्राथमिक माहिती आहे. दोघांनी मिळून अनेक विद्यार्थीनींचे व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर टाकले आहेत.

या दोघांनी मिळून अनेक विद्यार्थिंनींचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केल्याची माहिती आहे. ⁠या प्रकरणी चौकशी सुरू केली असून पोलीसांत तक्रार दिली असल्याचा खुलासा सीईओपीने केला आहे. संबधीत विद्यार्थिनीला डीबार केले असल्याचे तसेच चौकशी पूर्ण होईपंर्यत या विद्यार्थीनीला निलंबीत करण्यात आल्याचंही म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्री विजय यांना पहिल्याच दिवशी मोठा धक्का; पाठिंबा देणारा मित्रपक्ष झाला नाराज, नेमकं काय घडलं?

Accident News : लग्नाला निघालेल्या दाम्पत्याचा भीषण अपघात, भरधाव पिकअपची कारला जोरदार धडक

Maharashtra News Live Update: वाढत्या तापमानाचा परिणाम चिमुकल्यांवर होत असल्याने पालकांची चिंता वाढली

Protein Foods: प्रोटीनसाठी चिकन अन् प्रोटीन पावडर कशाला? हे 5 व्हेज पदार्थ आहेत सगळ्यात बेस्ट

Sanju Rathod Success Story: ट्रेनमध्ये बसून एकट्याने गाणी ऐकली, पण आज बनला प्रसिद्ध गायक ; 'गुलाबी साडी' फेम संजू राठोडला आठवला संघर्षाचा तो काळ

SCROLL FOR NEXT