Kalyan Crime: विनापरवाना मद्य विक्री प्रकरणी महिलेसह दोघांना अटक, राज्य उत्पादन शुल्क विभागाची डोंबिवलीत धडक कारवाई

Excise Department : याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा नोंद करत कारवाई केली. दारू कुठून आणली जाते व विक्री केली जाते याचा शोध आता एक्साईज विभाग करत आहे.
excise department seized liquor worth rs 6 lakhs arrests two in kalyan dombivli
excise department seized liquor worth rs 6 lakhs arrests two in kalyan dombivliSaam Digital
Published On

- अभिजित देशमुख

डोंबिवलीतील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गेल्या आठवड्याभरात धडक कारवाई करत विनापरवाना देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. या कारवाई दरम्यान दोघांना अटक करण्यात आली असून संशयित आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. (Maharashtra News)

मच्छी मार्केट परिसरात महिलेस अटक

डोंबिवली पश्चिमेकडील मच्छी मार्केट परिसरात महाराष्ट्र दिनी (एक मे) या ड्राय डेच्या दिवशी एक महिला देशी-विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती डोंबिवलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे मच्छी मार्केट परिसरात सापळा रचत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या मैनाबाई भोईर या महिलेला अटक केली. तिच्याकडून देशी विदेशी दारू असा एकूण एक लाख 31 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

excise department seized liquor worth rs 6 lakhs arrests two in kalyan dombivli
Dharashiv Police Video : मद्यधुंद पोलिसाचा मतदान केंद्रावर गोंधळ, VIDEO व्हायरल

डोंबिवलीत टेम्पोसह 188 लिटर विदेशी दारू जप्त

डोंबिवली मध्ये बेकायदेशीर विनापरवाना विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती डोंबिवलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे डोंबिवली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने डोंबिवली पूर्वेकडील निळजे परिसरात सापळा रचला.

एक टेम्पो संशयास्पद रित्या आढळून आल्याने या पथकाने टेम्पो थांबवून टेम्पोची झडती घेतली. या टेम्पोमध्ये 188 लिटर विदेशी दारू व बियर असा एकूण चार लाख 13 हजारांचा मुद्देमाल आढळून आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा नोंद करत टेम्पो व दारू जप्त केले. या प्रकरणी अमित यादव या टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे. त्यानेही दारू कुठून आणली याचा शोध आता एक्साईज विभाग करत आहे.

Edited By : Siddharth Latkar

excise department seized liquor worth rs 6 lakhs arrests two in kalyan dombivli
Unseasonal Rain: संभाजीनगर, यवतमाळ, नागपूरसह बुलढाण्यात वादळी वा-यासह पाऊस, आंब्यासह फळभाज्यांचे नुकसान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com