Unseasonal Rain: संभाजीनगर, यवतमाळ, नागपूरसह बुलढाण्यात वादळी वा-यासह पाऊस, आंब्यासह फळभाज्यांचे नुकसान

या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामातील कामाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना देखील या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
unseasonal rain hits sambhajinagar yavatmal and nagpur
unseasonal rain hits sambhajinagar yavatmal and nagpurSaam Digital

- माधव सावरगावे, संजय राठाेड, पराग ढाेबळे, संजय जाधव

छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, नागपूरसह बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात आज (गुरुवार) वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे आंब्याचे नुकसान झाल्याचे शेतक-यांनी सांगितले. (Maharashtra News)

गंगापूर, खुलताबाद, पैठणला पाऊस

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात आज अवकाळी पाऊस झाला. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसामुळे आंबा आणि शेतीमध्ये असलेल्या फळभाज्यांना फटका बसला आहे.

दरम्यान गेल्या दोन आठवड्यापासून तापमानाचा पारा ४० च्या वर गेल्याने उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र पावसामुळे दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील गंगापूर, खुलताबाद आणि पैठण तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाल्याचे शेतक-यांनी सांगितले.

unseasonal rain hits sambhajinagar yavatmal and nagpur
Success Story: पारंपारिक शेतीला बगल देत युवा शेतक-याने शेवगा शेतीतून कमविला लाखाेंचा नफा

यवतमाळला अवकाळी पावसाचा तडाखा

यवतमाळच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटसह पाऊस काेसळू लागल्याने नागरिकांची धावपळ उडाली. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे उकाड्यापासून यवतमाळकरांना दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामातील कामाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना देखील या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com