MNS Chief Raj Thackeray Saamtv
मुंबई/पुणे

Raj Thackeray News: 'वाजपेयींच्या सुरक्षारक्षकाने चक्क ताज हॅाटेल झाकायला सांगितले...' राज ठाकरेंनी सांगितला अजब प्रसंग

सत्तेत असणाऱ्यांकडे सौंदर्यदृष्टी नसल्यानेच शहरे बकाल होत आहेत. असे स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, प्रतिनिधी

Raj Thackeray News:

राजकीय नेत्यांकडे विकासाची दृष्टी हवी. सत्तेत असणाऱ्यांकडे सौंदर्यदृष्टी नसल्यानेच शहरे बकाल होत आहेत. असे स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. पुण्यामध्ये जागतिक आर्किटेक्ट दिनानिमित्त मनसे अध्यक्षांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत विविध विषयांवर भाष्य केले.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टमध्ये झालेल्या या मुलाखतीत राज ठाकरेंनी राज्यकर्त्यांवर निशाणा साधला. "शहरे वसवण्यासाठी किंवा सौंदर्यदृष्टी असायला हवी. मात्र महापालिकेमध्ये शहर नियोजन नाही. आर्किटेकपेक्षा पालिकेत इंजिनिअरला जास्त महत्त्व आहे, असा टोला मनसे अध्यक्षांनी लगावला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोबायोग्राफी प्रकाशनावेळी घडलेला एका खास किस्साही सांगितला.

राज ठाकरेंचा किस्सा त्यांच्या शब्दात..

२००६ साली गेट वे ऑफ इंडिया समोर मा. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या फोटोबायोग्राफी प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अटलबिहारी वाजपेयींच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार होते. यावेळी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atalbihari Vajpayee) यांच्या सिक्युरिटीमधील चिफ माझ्याकडे आला.

त्याने ताज हॉटेलकडे बोट दाखवत ये क्या है? असा प्रश्न विचारला. मी त्याला ताज हॉटेल है.. असे उत्तर दिले. यावर त्या तरुणाने अच्छा, ये तो बहोत डेंजर है, लेकिन इसको ढकना होगा, असे तो म्हणाला अन् मी संतापलो. असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एक मोठी ताजमहालची बिल्डींग झाकायची कशी? आर्कीटेक्टचा उत्तम नमुना असलेले हे हॉटेल कपड्याने झाकावे. हे त्याच्या मनात आले. असा विचार मनात कसा अन् कुठून येतो? असा सवाल विचारत त्यांच्यासोबत आपल्याला जायचं आहे का? असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zp School : शाळेत सुविधांची वानवा; विद्यार्थिनीचे सरपंच- ग्रामसेवकाला पत्र, व्यथा मांडत सुधारण्याची मागणी

Pivali Sadi Song: संसाराच्या गाड्यातून वैयक्तिक आयुष्याला सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी; 'पिवळी साडी' गाण्याची प्रेक्षकांमध्ये क्रेझ

Gateway Of India: गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास आणि खास 10 मनोरंजक तथ्ये

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Pune Crime: दुचाकीवरून ताम्हिणी घाटात गेले, दारू पिण्यावरून वाद; तरुणाने सख्ख्या भावाची केली हत्या

SCROLL FOR NEXT