Pune Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident : हिट अँड रनच्या घटनेनं पुणे पुन्हा हादरलं; अलिशान कारच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Pune Accident News : पुण्यात आलिशान कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीस्वार तरुणाला जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डींग समोर गुरुवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रौफ अकबर शेख असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर कारचालक हा घटनास्थळावरून फरार झाला होता.

मात्र, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्याला अटक केली आहे. आयुष प्रदीप तयाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो हडपसर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. आरोपीने मद्यपान करत कार चालवली असल्याचा संशय पोलिसांना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आयुष हा सुसाट वेगाने कार चालवत होता.

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास तो शहरातील एबीसी रोड कडून ताडी गुता चौकाकडे निघाला. यावेळी कारचालकाने प्रथम एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुचाकीवरून तिघेजण प्रवास करीत होते. अपघातात त्यांना किरकोळ मार लागला. आरोपीने घटनास्थळावर न थांबता सुसाट वेगात कार दामटवली.

त्यानंतर पुढे गुगल बिल्डींग समोर दुचाकीस्वार रुउफ अकबर शेख यास पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, कारची धडक बसताच रऊफ हा दुचाकीसह दूर फेकला गेला. स्थानिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी नोबल हॉस्पिटल येथे ऍडमिट केले. मात्र, उपचारापूर्वीच रउफ याचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता.

पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही तपासत कारचा क्रमांक प्राप्त केला. आरोपीला मध्यरात्री हडपसर येथून अटक करण्यात आली आहे. अपघात झाला तेव्हा आरोपीने मद्यपान केले असावे, असा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील घटनेचा तपास सुरु आहे. पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Driving Hacks : पावसाळ्यात तुमच्या गाडीचा अपघात होण्याची भिती वाटते?, तर हे ८ झटपट हॅक्स वापरा

Mumbai Local News : मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! मुंबई लोकलचे रखडलेले १६२०० कोटींचे रेल्वे प्रकल्प मार्गी लागणार

Maharashtra Live News Update: पुण्याच्या जीएसटी पथकाची नाशिकमध्ये छापेमारी

New Marathi Serial Update : मनोरंजनाची डबल मेजवानी, २ मराठी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

PostWork Out Meals: पोस्ट वर्कआउट मध्ये काय खावं? फिटनेससाठी हे' सुपरफूड्स उत्तम पर्याय

SCROLL FOR NEXT