Scene of devastation at Pune’s Navale Bridge after a container lost control and crashed into 12 vehicles, killing 8 people. saam tv
मुंबई/पुणे

Pune Accident: १२ गाड्यांचा चक्काचूर, ८ जणांचा मृत्यू; पुण्यातील नवले पुलावरील कंटेनरचा अपघात नेमका कसा घडला?

Pune Accident Update: पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघात झाला. एका भरधाव कंटेनरने नियंत्रण गमावल्यानंतर १२ वाहनांना धडक दिली.

Bharat Jadhav

  • पुणे-बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ कंटेनरचा भीषण अपघात झालाय.

  • ८ जणांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी झालेत.

  • कंटेनरचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या वाहनांना दिली धडक.

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

पुणे- बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. नियंत्रण सुटलेल्या भरधाव कंटेनरने समोरून जाणाऱ्या १२ वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चारजण गंभीर जखमी झालेत. दोन कंटेनरच्या धडकेनंतर एक कंटेनरला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

या अपघातात तब्बल १० ते १२ वाहनांचा चक्काचूर झाला. इतकी भयकंर दुर्घटना नेमकी कशी झाली याची माहिती समोर आलीय. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारा कंटेनर नवीन कात्रज बोगद्याच्या तीव्र उतारावरून येत होता. त्यावेळी तो कंटेनर अचानक नियंत्रणाबाहेर गेला.

वेग अतिशय प्रचंड असल्याने कंटेनरनने पुढील वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर मोटार समोरच्या ट्रकमध्ये अडकली आणि क्षणातच दोन्ही वाहनांना आग लागली. या भीषण अपघातात १० ते १२ वाहनांचा चक्काचूर झाला. अपघातानंतर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पुणे पोलीस, पीएमआरडीए व पुणे महापालिकेचे अग्निशामक दल दाखल झाले.

कसा घडला अपघात?

पुण्यातील नवले पूल अपघाताबत अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ०५. ४० वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात नवले पुलावर अपघात होऊन तीन वाहनांनी पेट घेतला, अशी माहिती मिळाली. त्याचवेळी तात्काळ सिंहगड, नवले, काञज, एरंडवणा टँकर, मुख्यालयातील रेस्क्यु व्हॅन तसेच पीएमआरडीए येथील एक रेस्क्यु व्हॅन व दोन फायरगाडी अशा एकूण 8 अग्निशमन वाहने रवाना झाली होती.

घटनास्थळी पोहचताच पाहिले की, दोन कंटेनर व त्यामध्ये चारचाकी वाहन अडकून त्याने ही मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. जवानांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. परंतु, दुर्देवाने या घटनेत कंटेनरमधून २ पुरुष आणि कारमधून २ पुरुष २ महिला व एक मुलगी असे एकूण ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत.

उपस्थित नागरिकांकडून समजले की, एका मोठ्या कंटेनरने आग लागण्याआधी मागे बर्‍याच वाहनांना धडक दिली होती आणि त्यामध्ये ही अनेक जण जखमी झाले आहेत. याठिकाणी अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासह चार अधिकारी व जवळपास चाळीस जवान कार्यरत होते.

साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारा कंटेनर नवीन कात्रज बोगद्याच्या तीव्र उतारावरून येत होता. त्यावेळी कंटेनरचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे कंटेनर अनिंयत्रित झाले त्यात त्याची धडक एका कारला झाली. त्यानंतर ही कार पुढील ट्रकमध्ये अडकली. काही वेळातच दोन्ही वाहनांना आग लागली. लागलीच ज्वाळांनी रौद्ररूप धारण केले आणि कारमधील चार प्रवाशांसह कंटेनरचा क्लिनर आणि इतर एकजण अशा सात जणांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT