Pune Accident: नवले पुलावरून जाताना ब्रेक फेल, कंटेनर अनेक वाहनांना उडवत गेला; मृतांचा आकडा वाढण्याची भीती, थरकाप उडवणारा VIDEO

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुलावर भयंकर अपघात झाला. भरधाव कंटेनरने १० ते १२ वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Pune Accident: नवले पुलावरून जाताना ब्रेक फेल, कंटेनर अनेक वाहनांना उडवत गेला; मृतांचा आकडा वाढण्याची भीती, थरकाप उडवणारा VIDEO
Pune AccidentSaam Tv
Published On

Summary -

  • नवले पुलावर कंटेनरला भीषण अपघात

  • चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले

  • कंटेनरने १० ते १२ वाहनांना धडक दिली

  • अपघातानंतर कंटेनरला आग

  • अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू

पुण्यातील नवले पुलावर आज भयंकर अपघाताची घटना घडली. नवले पुलावर भरधाव कंटेनरने १० ते १२ वाहनांना जोरदार धडक दिली. कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर पेट घेतला. यावेळी अनेक वाहनांना देखील आग लागली. या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे- बंगळुरू महामार्गावर अपघाताची ही भयंकर घटना घडली.

या अपघातामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर नवले पुलावर काचांचा ढीग, पेटलेली वाहनं, कारचा चुराडा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या पोलिस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाकडून मदतकार्य आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नवले पुलावर आज संध्याकाळी भीषण अपघात घडला. एका भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना धडक देत एका ट्रकला धडक दिली. कंटेनरने कार, दुचाकी आणि ट्रक अशा १० ते १२ वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये वाहनांचा चक्काचूर झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनेकांचा आगीमध्ये होरपळून अक्षरश: कोळसा झाला.

Pune Accident: नवले पुलावरून जाताना ब्रेक फेल, कंटेनर अनेक वाहनांना उडवत गेला; मृतांचा आकडा वाढण्याची भीती, थरकाप उडवणारा VIDEO
Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना उडवलं, ८ जणांचा मृत्यू

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, साताराहून पुण्याच्या दिशेने हा कंटेनर येत होता. नवले पुलावरून खाली उतरत असताना चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर या कंटेनरने समोर येईल त्या वाहनांना धडक दिली. या अपघातामुळे रस्त्यावर काचांचा ढीग पडला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या अपघातामुळे पुणे- बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Pune Accident: नवले पुलावरून जाताना ब्रेक फेल, कंटेनर अनेक वाहनांना उडवत गेला; मृतांचा आकडा वाढण्याची भीती, थरकाप उडवणारा VIDEO
Train Accident : मुंबईहून घराकडे निघाले, कसारा घाटात मृत्यूने गाठले, रेल्वेतून पडून काँग्रेस नेत्याचं निधन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com