File photo of Pune Municipal Corporation office amid controversy over missing food testing machine worth ₹11.98 lakh. saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात धक्कादायक प्रकार! 12 लाखांची फूड टेस्टिंग मशीनच झाली गायब; आरोग्य विभागाचा गलथान कारभार?

Pune municipal corporation missing food testing machine case: पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. तब्बल ११.९८ लाखांची फूड टेस्टिंग मशीन गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Akshay Badve

राज्यात एका बाजूला अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ विरोधी कारवाईचा धडका लावलाय मात्र असं असतानाच पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जवळपास 12 लाख रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेली फूड टेस्टिंग मशीन गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आलाय.

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळविरोधी कारवाईला वेग आला असताना, महापालिकेच्या आरोग्य विभागातील धक्कादायक निष्काळजीपणा समोर आला आहे. तब्बल ११ लाख ९८ हजार रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेली फूड टेस्टिंग मशीन गायब असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या प्रश्नोत्तरातून उघड झाली आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने ९ वर्षांपूर्वी ११.९८ लाख रुपयांची फूड टेस्टिंग मशीन खरेदी केली होती. ही मशीन पुण्यातील कोंढवा भागातील फूड हायजीन अँड हेल्थ लॅबोरेटरी येथे कार्यरत होती. त्या प्रयोगशाळेचा करार संपल्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये प्रयोगशाळेतील सर्व उपकरणांचा ताबा तत्कालीन पशुवैद्यकीय अधीक्षकांकडे देण्यात आला. महापालिकेच्या सभेत नगरसेवक महेश वाबळे यांनी ही मशीन सध्या कार्यरत अवस्थेत आहे का, तसेच मशीनचे सर्व भाग उपलब्ध आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरात फूड टेस्टिंग मशीन आढळून येत नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Rules:क्रिकेटच्या नियमात मोठे बदल; BCCI कोणते नवीन नियम लागू करणार?

बॉलीवूडच्या भाईजानला झालंय काय?भाईजानच्या नव्या लूकमुळे चाहत्यांना चिंता, सलमान आजारी की प्रमोशन फंडा?

Maharashtra News Live Update: पुण्यातील नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ चारचाकी वाहनाला लागली आग

एक राजीनामा घेऊ शकत नाहीत, नरेंद्र मोदी सर्वाधिक तरुणविरोधी पंतप्रधान; राहुल गांधींची घणाघाती टीका

बिबट्या थेट दारूच्या दुकानात शिरला अन् पुढं काय घडलं? पाहा थरार VIDEO

SCROLL FOR NEXT