

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सुरुवातीच्या कार्यकाळात काही महत्त्वाच्या योजनांची सुरुवात केली होती. ज्याचा फायदा नागरिकांना आर्थिक सुरक्षिततेसाठी होत आहे. त्यातली प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा (PMSBY) लाभ आजही लाखो लोक घेत आहेत.या योजनेचं वैशिष्ट म्हणजे फक्त २० रुपयांमध्ये वार्षिक प्रीमियममध्ये अपघाती विमा संरक्षण मिळतं.
PMSBY या योजनेमध्ये विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यावर किंवा कायमस्वरुपी अपंगत्व आल्यावर आर्थिक मदत दिली जाते. या विम्याचा कालावधी दरवर्षी १ जून ते पुढच्या वर्षाचा ३१ मे असा असतो. इच्छुक व्यक्ती या वेळेत कधीही योजनेत सहभागी होऊ शकतात. ज्या दिवसापासून नोंदणी केली जाते, त्याच दिवसापासून विमा संरक्षण लागू होतं.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचं वय १८ ते ७० वर्षे दरम्यान असणं गरजेचं आहे. वार्षिक प्रिमियम बँक खात्यातून ऑटो-डेबिट पद्धतीने घेतला जातो. प्रत्येक वर्षी विमा सुरू ठेवण्यासाठी प्रीमियमचे अपडेट करावा लागतो.
योजनेनुसार, अपघाती मृत्यू किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी पूर्णपणे जाणे, तसेच दोन्ही हात किंवा पाय निकामी झाले असतील तर 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा लाभ दिला जातो. एका डोळ्याची दृष्टी गेली असेल किंवा एक हात किंवा एक पाय निकामी झाला असेल तर 1 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते. या योजनेमध्ये मॅच्युरिटीनंतर (Maturity) किंवा सरेंडर (Surrender) लाभ दिला जात नाही.
या योजनेसाठी अर्ज करणं सोपं आहे. संबंधित बँकेच्या नेट बँकिंग किंवा इतर उपलब्ध सुविधांच्या मदतीने 'इन्शुरन्स' विभागात जाऊन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना निवडा. त्यानंतर बँक खातं निवडून ऑटो-डेबिटला संमती दिल्यानंतर अर्जाची प्रोसेस पूर्ण होते. अर्ज मंजूर झाल्यानंतर पावतीही डाउनलोड करता येते.
पण समजा एखाद्या व्यक्तीची एकापेक्षा जास्त बँक खाती असली तरी या योजनेचा लाभ फक्त एका बँक खात्याच्या मदतीने घेता येतो. कमी प्रीमियममध्ये अपघाती विमा संरक्षण मिळत असल्यामुळे ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी फायदेशीर मानली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.