Ghatkopar Hoarding Collapse Saam Tv
मुंबई/पुणे

Ghatkopar Hoarding Collapse: आरोपी भावेश भिंडेंच्या वार्षिक कमाईची माहिती आली समोर, पुणे महापालिकाही अलर्ट मोडवर

Pune Municipal Commissioner Order: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. तर घाटकोपर दुर्घटनेतील भावेश भिंडे हा होर्डिंगच्या माध्यमातुन वर्षाला २५ कोटी रूपये कमवत असल्याचं समोर आलं आहे.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे साम टीव्ही, पुणे

पुणे शहरातील धोकादायक होर्डिंग सात दिवसात काढून टाका, असे आदेश पुणे महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. जे कारवाई करणार नाहीत. त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड दम आयुक्तांनी दिलेला आहे. पुण्यात देखील अधिकृत २ हजार ५९८ होर्डिंग आहेत. परंतु त्यात अनेक नियमबाह्य होर्डिंग देखील आहेत. त्यास प्रशासनाकडून अभय दिलं जात असल्याचा आरोप देखील केला जात आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे प्रशासन अलर्ट झाल्याचं दिसतं आहे. मुंबईमध्ये या दुर्घटनेत आतापर्यंत सोळा जणांचा बळी गेल्याचं समोर आलं आहे. अशी दुर्घटना पुण्यात घडू नये म्हणून पुणे महापालिका प्रशासन (Ghatkopar Hoarding Collapse) प्रयत्न करत आहे. आता महापालिका आयुक्तांनी धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

घाटकोपर दुर्घटनेतील होर्डिंगचा मालक भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) फरार आहे. तो सातत्याने त्याचं ठिकाण बदलत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी सात पथकं रवाना केले आहेत. भावेश भिंडे जाहिरात फलकातून वर्षाला २५ कोटी रूपये कमवत असल्याची माहिती समोर आली आहे. लोहमार्ग पोलिसांच्या जमिनीवर उभारलेल्या ४ होर्डिंगमध्ये भावेश भिंडे २५ कोटी रूपये कमवत होत. तीन होर्डिंग २०२१ मध्ये लावण्यात आले होते. तर कोसळलेलं चौथं होर्डिंग २०२२ मध्ये लावण्यात आलेलं (Pune News) होतं.

मुंबईतील होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर नागपूर महानगरपालिका कामाला लागली आहे. नागपूर मनपाकडून अवैध होर्डिंग्जचा सर्वे सुरु आहे. मनपाची परवानगी घेऊन लागलेले १०५३ होर्डिंग्ज, त्यासोबतच रेल्वेच्या होर्डिग्जचंही (Dangerous Hoardings) स्ट्रक्चरल ॲाडीट होणार असल्याची माहिती मिळत आहे. नागपूर मनपाकडून या सर्वेक्षणासाठी दोन टीम गठीत करण्यात आल्या आहेत. आजपासून सर्वे सुरु होणार आहे.

होर्डिंग्ज धोकादायक आहे की नाही, याची पाहणी करुन धोकादायक असलेल्या होर्डिंग्जवर कारवाई होणार आहे. तर फिटनेस प्रमाणपत्र देणाऱ्या एजन्सीवर कारवाई होणार असल्याचं नागपूर महापालिकेनं सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT