Ajit Pawar on Vaishnavi Hagawane Case Saam Tv News
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, केस स्ट्राँग करु, तडकाफडकी निकाल; अजित पवारांचा कस्पटेंना शब्द

Ajit Pawar on Vaishnavi Hagawane Case : आरोपी फोन आणि गाडी वारंवार बदलत होता, मात्र पोलिसांनी जुळवाजुळव करुन चांगली कारवाई केली. आता न्यायालयात ही त्यांना कठोर शिक्षा होईल, त्याअनुषंगाने पावलं उचलायला सांगितलं आहे.

Prashant Patil

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वैष्णवीच्या माहेरी जाऊन कुटुंबीयांचं सांत्वन केलं. वैष्णवीच्या वडिलांसोबत फोनवरुन संवाद साधल्यानंतर अजित पवारांनी आज त्यांच्या घरी जाऊन आई-वडिलांची भेट घेत संपूर्ण घटना जाणून घेतली. यावेळी, मोठा पोलीस बंदोबस्त कस्पटे कुटुंबीयांच्या घराबाहेर दिसून आला. पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधत भूमिका आणि तपासाबाबत माहिती दिली. तसेच, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल, याचा लवकर निकाल लागेल असंही अजित पवारांनी सांगितलं. तर, वैष्णवीचे मामासासरे असलेल्या पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनाही अजित पवारांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांना पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास अटक केली. या अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे राजकीय वर्तुळातही या घटनेवरुन संताप व्यक्त होत असून भाजपच्या महिलांनी कोर्टाबाहेर आंदोलन करत, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आज सकाळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट घेऊन सांत्वन केलं. त्यानंतर, माध्यमांशी संवाद साधताना, या प्रकरणी कोणाचीही हयगय केली जाणार नाही, राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं.

आरोपी फोन आणि गाडी सतत बदलत होता, मात्र पोलिसांनी जुळवाजुळव करुन चांगली कारवाई केली. आता न्यायालयात ही त्यांना कठोर शिक्षा होईल, त्याअनुषंगाने पावलं उचलायला सांगितलं आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल, तातडीनं निकाल लागेल. कारण, ही अतिशय वेदनादायक घटना आहे, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. पुणे सीपी अंडर येणाऱ्या एरियातील निलेश चव्हाणकडे बंदूक आहे, त्यासाठीही कठोर कारवाईचे आदेश पुण्याच्या सीपींना दिले आहेत. त्यानेही घटस्फोट दिल्याचं समजलं आहे, दुसरीकडे मोठी सून मयुरीचाही छळ केल्याचं समोर आलंय. या सर्वांच्या अनुषंगाने केस स्ट्राँग केली जाईल, असं पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasota Fort: सातारा जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वसलाय वासोटा किल्ला, पर्यटकांचे वेधून घेतोय लक्ष

टीचभर नेपाळची चीनसारखी वाकडी चाल; १०० रुपयांच्या नोटेवर ३ ठिकाणांवर दावा, भारताची सटकली!

BMC Election : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार; तेजस्वीनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?

राजकारणात मोठा भूकंप! शिंदेसेना आणि काँग्रेसची युती, एकाच बॅनरवर झळकले एकनाथ शिंदे, राहुल आणि सोनिया गांधींचे फोटो

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित दादांसमोर शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी वजनावरून मांडली व्यथा

SCROLL FOR NEXT