Pune Mhada Lottery  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Mhada: पुणे म्हाडाच्या ४१८६ घरांसाठीची सोडत पुन्हा लांबणीवर; आता नवीन तारीख काय?

Pune Mhada Lottery for 4186 Houses: पुणे म्हाडाच्या घरांसाठीची सोडत पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे.याआधीही सोडत तीनदा लांबणीवर गेली होती. त्यानंतर आता ही सोडत कधी निघणार असा प्रश्न विचारला जात आहे.

Siddhi Hande

पुणे म्हाडा मंडळाच्या घरांची सोडत पुन्हा एकदा लांबणीवर

४१८६ सोडत कधी निघणार?

दोन लाख १५ हजार अर्जदारांना सोडतीची प्रतिक्षा

पुणे म्हाडा मंडळाच्या ४१८६ घरांसाठीची सोडत पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. या घरांसाठी १६ किंवा १७ डिसेंबरला सोडत काढली जाईल, असं पुणे मंडळाने सांगितले होते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे ही सोडत रद्द करण्यात आली होती. दरम्यान, यामुळे घरांसाठी अर्ज केलेल्या नागरिकांची प्रतिक्षा वाढली आहे.

पुणे मंडळाच्या घरांसाठीची सोडत पुढे ढकलली

सुमारे दोन लाख १५ हजार अर्जदारांना सोडतीची प्रतिक्षा आहे. येत्या १-२ दिवसात घरांसाठी सोडतीची नवीन तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.सोमवारी सायंकाळी ६ वाजता पात्र अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली.

पुणे महामंडळाच्या घरांसाठी ११ सप्टेंबरपासून नोंदणी सुरु झाली होती. एकूण ४१८६ घरांसाठी ही सोडत जाहीर केली होती. यामध्ये २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ३२२२ घरांसह १५ टक्के एकात्मिक योजनेतील ८६४ घरांचा सोडतीत समावेश आहे. ४१८६ घरांसाठी सोडतपूर्व प्रक्रिया सुरू झाली. मात्र संगणकीय प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे या प्रक्रियेस दोनदा मुदतवाढ देण्यात आली.

ही मुदतवाढ २१ नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली होती.त्यानंतर पुन्हा मुदत वाढवून ११ डिसेंबर करण्यात आली होती. ही सोडतदेखील पुढे ढकलली. त्यानंतर १६ की १७ डिसेंबरला सोडत काढली जाईल, असं पुणे मंडळाकडून जाहीर केले होते. मात्र, आता तेव्हादेखील सोडत निघणार नसल्याचे सांगितले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,दोन लाख १५ हजार अर्जांची छाननी पूर्ण करून त्यांची प्रारूप यादी पूर्ण करण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे सोडत लांबणीवर पडली आहे. अर्जांच्या छाननीचे काम आता पूर्ण झाले असून प्रारूप यादी प्रसिद्ध करून त्यावरील सुनावणी-हरकती मागवून अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे ही सोडत पुढे ढकलण्याची वेळ मंडळावर आली आहे. मात्र, ही सोडत कधी निघणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT