Pune News: धक्कादायक! मुख्यमंत्र्यांसाठी रस्ता बदलला, वाहतूक कोंडीमुळे शिक्षक महिलेचा जीव गेला

Teacher woman Dies In Kondhwa Traffic: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यासाठी रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आला. यामुळे एक अपघात घडला असून ५३ वर्षीय महिला शिक्षिकेचा मृत्यू झालाय. यात वाहतूक व्यवस्थेतील गंभीर गैरव्यवस्थापन उघड झाले आहे.
Teacher woman Dies In Kondhwa Traffic
Traffic congestion in Pune’s Kondhwa area after road diversion during the Chief Minister’s visit.saam tv
Published On
Summary
  • मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यासाठी रस्ता बदलल्याने पुण्यात मोठी वाहतूक कोंडी झाली.

  • कोंढवा परिसरात झालेल्या अपघातात ५३ वर्षीय शिक्षिका रमा कापडी यांचा मृत्यू झाला.

  • वाहतूक नियोजन अपयशी ठरत असल्याचा पुन्हा एकदा आरोप .

पुण्यातील वाहतूक कोंडी या विषयावर अनेक वेळा नुसत्या चर्चा होतात मतं मांडली जातात बजेट पास होतात, मात्र परिस्थिती जैसे थे आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुणे दौरा होता, याचा पहिला टप्पा म्हणजे शहरातील कोंढवा भागात ते एका कार्यक्रमाला येणार असल्यामुळे पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने रस्ता बदलला. याच निर्णयामुळे एका शिक्षक महिलेला आपला जीव याच रस्त्यावरील अपघातात गमवावा लागला. रमा कापडी (वय ५३) असे अपघातामध्ये मृत्युमुखी झालेल्या महिलेचे नाव आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडी या विषयावर अनेक नेते मंडळी जोरदार भाषणं करतात, आश्वासनं देतात पण शहरातील परिस्थिती मध्ये कुठला ही बदल झालेला दिसत नाही. पुणे शहराचा विस्तार चार ही बाजूने होतोय मात्र यात वाहतूक नियोजन कसं करावं यावर कुठल्याही ठोस उपाययोजना राबवल्या जात नाहीत. आता पुन्हा एकदा याच वाहतूक कोंडीचा बळी ठरल्या त्या म्हणजे ५३ वर्षीय निष्पाप रमा कापडी.

आज कोंढवा रोड याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक कार्यक्रम त्या ठिकाणचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी आयोजित केला होता. कार्यक्रम जरी आज नियोजित होता तरी सुद्धा या परिसरात गेल्या ३ दिवसांपासून वाहतूक वळवण्यात आली होती. आज सुद्धा या परिसरात सकाळपासून मोठी गर्दी होती. स्थानिक आमदार, कार्यकर्ते, ढोल ताशा पथकं आणि इतर सर्व जणं याठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीत होते. दुसऱ्या बाजूला, शिक्षिका असल्यामुळे नेहमी प्रमाणे रमा कापडी या घरातून त्या शिकवत असल्या जे.एस.पी.एम मध्ये निघाल्या.

रस्ता बंद असल्याचा अंदाज त्यांना आला नाही त्यामुळे चुकून त्याविरुद्ध दिशेने गेल्या पण त्यांना एका कंटेनर ने धडक दिली. कंटेनर चे चाक त्यांच्या पायावरून गेल्यामुळे त्या अक्रशः रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. स्थानिकांनी तात्काळ त्याठिकाणी धाव घेतली. मदतीचा आर्त हाक मारणाऱ्या कापडी यांना तिथून काही अंतरापर्यंत झालेल्या वाहतूक कोंडीमुळे कुठलीच मदत मिळाली नाही आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

Teacher woman Dies In Kondhwa Traffic
परीक्षा देऊन विद्यार्थिनी रिक्षाने घरी निघाली; रस्त्यात चालकाची नियत फिरली; निर्जनस्थळी अब्रू लुटली

कापडी जे.एस.पी.एम मध्ये शिक्षिका होत्या. या महिलेच्या पतीचे 15 वर्षांपूर्वी निधन झाले होते त्यांच्या मागे मुलगी व आई असे २ जणं आहेत. पोलीस उपआयुक्त हिम्मत जाधव यांना या अपघाताबाबत आणि वाहतूक वळवण्याचा निर्णयाबाबत विचारले असता, "घडलेली घटना दुर्दैवी आहे. मी स्वतः या घटनेबाबत चौकशी केली आणि पुढील तपास सुरू आहे" अशी सौम्य प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामुळे रस्ता वळवण्यात आला होता आणि हा वळवलेला रस्ता लक्षात न आल्याने रमा कापडी यांचा अपघात होऊन त्यांना आपला जीव गमवावा लागला याला जबाबदार कोण? असा सवाल शिवसेना नेते वसंत मोरे यांनी विचारला आहे.

Teacher woman Dies In Kondhwa Traffic
Shocking: मेलेला माणूस जिवंत झाला; पोलीस तपासात समोर आलं चक्रावून टाकणारं सत्य

आज कोंढवा रोड मुख्यमंत्री यांचा कार्यक्रम होता मात्र गेल्या ३ दिवसांपासून या रस्त्यावरची वाहतूक वळवण्यात आली होती. रस्ता वळवला असल्याचा अंदाज न आल्यामुळे त्या महिलेने विरुद्ध दिशेने प्रवास केला मात्र एका कंटेनर खाली येऊन त्यांचा अपघात झाला. अपघातात त्यांचा मोठा रक्तस्त्राव झाला त्यातच रस्ता बंद असल्यामुळे त्यांच्यापर्यंत कुठलेही उपचार पोहोचू शकले नसल्यामुळे त्यांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला.

पुण्यातील वाहतूक कोंडीवर फक्त चर्चा अन् चर्चा

पुण्यातील वाहतूक कोंडी हा सध्या राज्यभरात चर्चेचा विषय आहे. त्यात पुण्यातील कात्रज कोंढवा रस्ता हा तर मृत्यूचा सापळा बनला आहे. गेला साडेचार वर्षांमध्ये या रस्त्यावर 25 हुन अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. कात्रज कोंढवा रस्त्याचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू असून हा रस्ता अद्यापपर्यंत अपूर्ण आहे. या रस्त्यावर अनेक मोठे अपघात झाले असून यात शेकडो नागरिकांचा निष्पाप बळी गेला आहे.

मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याचे पुणे पोलिसांना असतं नेहमीच टेन्शन?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात येणार आहेत याबाबत जेव्हा पोलिसांना कळवले जाते त्याच दिवसापासून पुणे पोलिसांना याचे एक मोठे आव्हान असते. मुख्यमंत्री राज्यात अनेक ठिकाणी प्रवास करतात आणि त्यांची सुरक्षा यामध्ये कुठली ही चूक घडता कामा नये यासाठी पोलिस प्रशासन नेहमीच कठोर पाऊलं उचलतात पण पुण्यात हे चित्र "अँडव्हान्स लेव्हल" चे पाहायला मिळतं.

मुख्यमंत्री यांच्या दौऱ्या निमित्त वाहतुकीत बदल, अचानकपणे रस्ते बंद करणे, स्थानिक दुकानं बंद ठेवणे, माध्यमांना मुख्यमंत्री यांच्यापासून लांब उभे करणे, नागरिकांना मुख्यमंत्री ची छबी दिसू न देणे अशा अनेक गोष्टीत पुणे पोलिस एका दिवसासाठी "सुपर ऍक्टिव्ह" असतात. एका दिवसाच्या दौऱ्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपआयुक्त यासह दलातील बहुतांश वरिष्ठ अधिकारी सर्व रस्त्यावर असतात. हीच तत्परता दररोज शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी दाखवली तर निश्चितपणे त्यावर आळा घालता येईल असा छुपा सूर पुणेकरांकडून ऐकायला मिळतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com