Pune Metro Work Baner Road Closed Saam TV
मुंबई/पुणे

Pune Metro: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, आजपासून ४ दिवस बाणेर रस्ता वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणते?

Pune Metro Work Road Closed: पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आजपासून हॉटेल ग्रीन पार्क चौक ते पल्लोड फार्म रस्त्यावर मेट्रोचं काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील बाणेर रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Pune Metro Work Road Closed: पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आजपासून हॉटेल ग्रीन पार्क चौक ते पल्लोड फार्म रस्त्यावर मेट्रोचं काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील बाणेर रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. येत्या १५ ऑगस्टपर्यंत हे बदल असणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्टला पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं अनावर झालं. यामुळे पुणेकरांचा प्रवास सुखकर झाला असून अनेकजण मेट्रोने प्रवास करीत आहेत. मात्र, शहरात ठिकठिकाणी मेट्रोचं काम सुरू असताना पुणेकरांना वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागत आहे.

आजपासून बाणेर रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू होणार असल्याने हॉटेल ग्रीन पार्क चौक ते महाबळेश्वर हॉटेलकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. दरम्यान कामामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद केली जाणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं सांगण्यात आलं आहे.

कसे असतील पर्यायी मार्ग?

- पुणे विद्यापीठ चौकाकडून अभिमान श्री जंक्शन येथून बाणेरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी बाणेर फाटा चौकामधून उजवीकडे वळावे. ‘आयटीआय’ रस्त्यावरून परिहार चौक, डावीकडे वळण घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे, नागरस रस्त्यावरून महाबळेश्वर हॉटेलजवळ बाणेर रस्त्यावर जावे.

- ग्रीन पार्क हॉटेल चौकामधून डावीकडे वळण घेऊन सोमेश्वर मंदिरमार्गे राम नदीवरील पुलानंतर उजवीकडे वळण घेऊन पासपोर्ट कार्यालयासमोरून वाहनचालकांना बाणेर रस्त्यावर जाता येईल. दरम्यान, मेट्रोच्या कामामुळे पीएमपी ५ मार्गांवरील बसचे मार्ग देखील बदलण्यात आले आहेत.

बस बाणेरकडे जाताना बाणेरफाटा चौकातून उजवीकडे वळून सर्जा हॉटेल, औंध आयटीआय, परिहार चौकातून पुढे डावीकडे वळण घेऊन डीपी रस्त्याने आंबेडकर चौक येथून उजवीकडे वळण घेऊन मिडी पॉइंट हॉस्पिटलपासून डावीकडे वळण घेऊन लिंक रस्त्याने ताम्हाणे चौकातून डावीकडे वळण घेऊन कपिल मल्हार चौकातून बाणेर बस थांब्यावर येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT