Pune Crime News: पती नव्हे हैवान! पत्नीला विवस्त्र करून नाचायला लावलं; मोबाईलवर व्हिडीओही बनवले, पुण्यातील घटना

Pune Crime News: पुणे शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मोबाईलमधील अश्लील चित्रफीत दाखवून एका नराधम पतीने पत्नीला विवस्त्र करून नाचायला लावलं.
Pune Crime News husband made obscene videos of his wife case has been filed police
Pune Crime News husband made obscene videos of his wife case has been filed policeSaam TV

Pune Crime News: पुणे शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मोबाईलमधील अश्लील चित्रफीत दाखवून एका नराधम पतीने पत्नीला विवस्त्र करून नाचायला लावलं. इतकंच नाही, तर त्याने या प्रकाराचे मोबाईलवर व्हिडीओ देखील बनवले. याप्रकरणी ३१ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

Pune Crime News husband made obscene videos of his wife case has been filed police
Dhule News: बॅनर फाडल्यावरून दोन गटात वाद, संतप्त जमावाने भाजप आमदाराची कार फोडली; धुळ्यात मध्यरात्री काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपीला ५ वर्षांचा मुलगा आहे. आरोपी पती हा नेहमीच फिर्यादीला मोबाईलमध्ये अश्लील चित्रफित दाखवत होता. मोबाईलमधील व्हिडीओ पाहून तशाच प्रकारे शरीरसंबंध प्रस्तापित करत होता.

इतकंच नाही, तर आरोपीने अनेकदा पत्नीला विवस्त्र करून नाचायला लावलं. पत्नीने या गोष्टींना विरोध केल्यास मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत असे. सुरूवातीला फिर्यादी महिलेने हा संपूर्ण प्रकार कुणालाही सांगितला नाही.

Pune Crime News husband made obscene videos of his wife case has been filed police
Eknath Shinde News: 'पत्रकारांवर कोणत्याही परिस्थितीत...'; पत्रकार मारहाण प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

मात्र, दिवसेंदिवस पतीची विकृती वाढत असल्याने फिर्यादी महिला आपल्या माहेरी निघून गेली. त्यावेळी सुद्धा पतीने फिर्यादी महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीच्या पतीने मेव्हणीच्या कार्यालयामध्ये पत्र पाठवून ती रेक्स रॅकेट चालवत असल्याचे सांगून बदनामी केली आहे.

अखेर पतीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून पत्नीने पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com