Dhule breaking news argument between two groups over banner tearing in shirpur taluka
Dhule breaking news argument between two groups over banner tearing in shirpur talukaSaam TV

Dhule News: बॅनर फाडल्यावरून दोन गटात वाद, संतप्त जमावाने भाजप आमदाराची कार फोडली; धुळ्यात मध्यरात्री काय घडलं?

Dhule Two Group Clash News: धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील चरण पाडा येथे गुरूवारी रात्री बॅनर फाडल्याच्या कारणावरून दोन गटात बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली.
Published on

Dhule Two Group Clash News: धुळे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येतेय. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील चरण पाडा येथे गुरूवारी रात्री बॅनर फाडल्याच्या कारणावरून दोन गटात बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. यावेळी संतप्त जमावाने मध्यस्थी करण्यासाठी आलेले भाजप आमदार काशीराम पावरा यांचे वाहन देखील फोडले.

Dhule breaking news argument between two groups over banner tearing in shirpur taluka
Mumbai Ganeshotsav 2023: गणेश मंडळांसाठी गुड न्यूज, गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

या घटनेमध्ये आमदार काशीराम पावरा थोड्यावत बचावले असून जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे एसआरपीएफ पथकाला पाचारण करण्यास आले. या पथकातर्फे रात्री उशिरापर्यंत हा तनाव दूर करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले.

आता या ठिकाणी परिस्थिती आटोक्यात आली असून सध्या परिसरात तणापूर्ण शांतता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील (Dhule News) चरण पाडा येथे गुरूवारी रात्री बॅनर फाडल्याच्या कारणावरून दोन गटात बाचाबाची झाली.

क्षणार्धात या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. वाद इतका विकोपाला गेला, की दोन्ही गटातील हजारो लोक मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर उतरले. यावेळी संतप्त जमावाने मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला. यादरम्यान जमावाची समजूत काढण्यासाठी गेलेले भाजपचे स्थानिक आमदार काशीराम पावरा यांचे वाहन देखील संतप्त जमावाने फोडले.

Dhule breaking news argument between two groups over banner tearing in shirpur taluka
Shivsena Podcast Sanjay Raut: 'शिवसेना तोडणं म्हणजे...'; संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

इतकंच नाही, तर पोलिसांची (police) व्हॅन देखील फोडण्यात आली. या घटनेमध्ये आमदार काशीराम पावरा बचावल्याची माहिती आहे. दरम्यान, परिस्थिती हातबाहेर जात असल्याचं लक्षात येताच, पोलिसांतर्फे एसआरपीएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले.

रात्री उशीरापर्यंत पथकातर्फे तणाव दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते. सध्या परिस्थिती आटोक्यात आली असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेत दोन्ही गटातील ५ ते ६ जण जखमी देखील झाले आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी दगडफेक तसंच आंदोलन करणाऱ्या काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com