Mumbai Ganeshotsav 2023: गणेश मंडळांसाठी गुड न्यूज, गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

Ganesh Murti Hight Rule 2023: गणेशोत्सव अगदी महिनाभरावर येऊन ठेपला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अनेकजण तयारीला लागले आहेत.
mumbai ganeshotsav 2023 municipal corporation has issued a new guarantee
mumbai ganeshotsav 2023 municipal corporation has issued a new guarantee Saam TV
Published On

Mumbai Ganeshotsav News 2023:

गणेशोत्सव अगदी महिनाभरावर येऊन ठेपला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अनेकजण तयारीला लागले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज देखील करण्यास सुरूवात केली आहे. अशातच गणेश मंडळांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज करताना सादर कराव्या लागणाऱ्या हमीपत्रात ४ फुटांपर्यंतची मूर्ती, तसेच शाडू, पर्यावरणपूरक मूर्तींची अट घालण्यात आली होती. यामुळे गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती.

mumbai ganeshotsav 2023 municipal corporation has issued a new guarantee
Shivsena Podcast Sanjay Raut: 'शिवसेना तोडणं म्हणजे...'; संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

अखेर गुरुवारी मुंबई महापालिकेने नवीन हमीपत्र जारी केल्याचे परिपत्रकच काढलं आहे. या नवीन हमीपत्रातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी गणेशमूर्तींची उंची आणि पर्यावरणपूरक मूर्तींची अट काढण्यात आली. मुंबई महापालिकेच्या या निर्णयामुळे सार्वजनिक गणपती मंडळांना मोठा दिलासा मिळाला असून आपल्या आवडत्या बाप्पाचं आगमन करण्याची मार्ग मोकळा झाला आहे.

हमीपत्रात काय आहे?

जुन्या हमीपत्रात ‘प्रतिष्ठापना करत असलेली चार फुटांपर्यंतची मूर्ती शाडू, पर्यावरणपूरक साहित्याने साकारलेली असेल, हे आम्हाला मान्य असेल,’ अशी अट होती. त्यामुळे मंडप परवानगीसाठी सुरू करण्यात आलेले ऑनलाइन अर्ज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून सादर करण्यात आले नाहीत. या हमीपत्रातील अटींवरून मंडळांमध्ये गोंधळ निर्माण झाला.

mumbai ganeshotsav 2023 municipal corporation has issued a new guarantee
Andaman Nicobar Earthquake: अंदमान-निकोबारमध्ये भल्यापहाटे भूकंपाचे धक्के; लोक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पळाले

अखेर गुरुवारी मुंबई महापालिकेने नवीन हमीपत्रासंदर्भात परिपत्रक जारी करून ही अट काढली. हमीपत्रात काही दुरुस्ती आवश्यक असल्याने सुधारित हमीपत्र तयार करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली.

दरम्यान, राज्य सरकारने १७ मेच्या बैठकीत दिलेल्या निर्देशाप्रमाणे पीओपीची मूर्ती ठेवण्यास आक्षेप घेतला नसल्याचे बृहमुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहीबावकर यांनी सांगितले. मुंबई महापालिकेचे उपायुक्त आणि गणेशोत्सव समन्वयक रमकांत बिरादार यांनी, नवीन हमीपत्र काढले आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com