Kokan Ganpati Festival Special Trains: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर गणपती स्पेशल गाड्यांच्या आणखी काही फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याआधीही पश्चिम रेल्वेने गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा केली होती. यात आता आणखी भर पडणार आहे. ज्याचा फायदा कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना होणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात या गाड्यांच्या २२ फेऱ्या होतील. यातील दोन गाड्या उधना स्थानकातून मडगाव आणि मंगळुरूपर्यंत धावणार. या दोन्ही गाड्या गोव्यातील थिविम स्थानकावर थांबतील. ट्रेन क्रमांक ०९०२०, ०९०५७ आणि ०९४१२ साठी बुकिंग १२ ऑगस्टपासून सर्व PRS काउंटरवर आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल.
ट्रेन क्रमांक ०९४१२/०९४११ अहमदाबाद-कुडाळ साप्ताहिक विशेष ६ फेऱ्यांमध्ये धावेल
गाडी क्रमांक ०९४१२ अहमदाबाद - कुडाळ स्पेशल अहमदाबादहून दर मंगळवारी सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता कुडाळला पोहोचेल. ही ट्रेन १२ ते २६ सप्टेंबर दरम्यान धावणार आहे. त्याचप्रमाणे ०९४११ कुडाळ - अहमदाबाद स्पेशल कुडाळहून दर बुधवारी ०६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३:३० वाजता अहमदाबादला पोहोचेल. (Latest marathi News)
ही ट्रेन १३ ते २७ सप्टेंबर दरम्यान धावणार आहे. ही गाडी वडोदरा, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकावर थांबतील.
ट्रेन क्रमांक 09057/09058 उधना – मंगळुरु साप्ताहिक स्पेशल ६ फेऱ्यांमध्ये धावेल
ट्रेन क्रमांक ०९०५७ उधना – मंगळुरु स्पेशल उधना दर बुधवारी २०.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १८.३० वाजता मंगळुरूला पोहोचेल. ही ट्रेन १३ ते २७ सप्टेंबर दरम्यान धावणार आहे. त्याचप्रमाणे ०९०५८ मंगळुरु - उधना स्पेशल मंगळुरूहून दर गुरुवारी २०.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २०.०० वाजता उधना येथे पोहोचेल. ही ट्रेन १४ ते २८ सप्टेंबर २०२३ दरम्यान धावणार आहे.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, या मार्गावरून धावेल. मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बांदूर, कुंदापुरा आणि सुरथकल स्थानकावर थांबेल. ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी २-टायर, एसी ३-टायर, स्लीपर क्लास आणि सेकंड क्लास कंपार्टमेंट असतील.
ट्रेन क्रमांक ०९०२०/०९०१९ उधना-मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष १० फेऱ्या
गाडी क्रमांक ०९०२० उधना – मडगाव स्पेशल उधना येथून दर शनिवार आणि बुधवारी १५.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०९.३० वाजता मडगावला पोहोचेल. ही ट्रेन १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान धावणार आहे. त्याचप्रमाणे ०९०१९ मडगाव - उधना स्पेशल मडगावहून दर रविवारी आणि गुरुवारी १०.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ५.०० वाजता उधना येथे पोहोचेल.
ही ट्रेन १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान धावणार आहे. ही गाडी नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी येथे थांबेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी २-टायर, एसी ३-टायर, स्लीपर क्लास आणि सेकंड क्लास डबे असतील.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.