Pune Indrayani Bridge Collapse Live Video Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Indrayani Bridge Collapse : त्यांना वाचवा...त्यांना वाचवा...महिलेच्या किंकाळ्या अन्...; पूल कोसळल्याचा चित्तथरारक VIDEO समोर

Pune Indrayani Bridge Collapse Live Video : पूल कोसळला तेव्हा त्या पुलावर ५० ते १०० पर्यटक होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. तसेच पूल कोसळला तेव्हा नेमकं काय घडलं? ते देखील कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

Prashant Patil

पुणे : पुण्याच्या मावळ तालुक्यात आज अतिशय दुर्दैवी घटना घडली. मावळ तालुक्यातील कुंडमळा पर्यटनस्थळी इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला. विशेष म्हणजे मावळ तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी प्रवाहीत झाली आहे. अशा परिस्थिती पूल कोसळला. त्यामुळे मोठी हानी झाली आहे.

पूल कोसळला तेव्हा त्या पुलावर ५० ते १०० पर्यटक होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. तसेच पूल कोसळला तेव्हा नेमकं काय घडलं? ते देखील कॅमेऱ्यात कैद झालं आहे. अतिशय चित्तथरारक अशी घटना ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पूल कोसळल्यानंतर प्रचंड किंकाळ्या ऐकू येतात. यावेळी काही जण नदीच्या प्रवाहासोबत वाहून जाताना दिसत आहेत. अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर हा पूल कोसळला तेव्हा काही दुचाकी देखील त्यात अडकलेल्या पाहायला मिळायला येत आहे.

नेमकं काय घडलं?

रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते. काही जण पुलावर उभारले होते. तेव्हा हा पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये नेमके किती जण बुडाले आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. अंदाजे २० ते २५ जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवर एक जुना पूल आहे. या पुलावर अनेक पर्यटक उपस्थित होते. सुट्टीचा दिवस असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी होती. त्यातच हा पूल कोसळल्याने अनेक जण वाहून गेले. यामध्ये काही लहान मुलेही असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कुंडमळामध्ये ही दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणी एनडीआरएफचे पथक दाखल झालं असून बचाव कार्य सुरू आहे. तसेच या ठिकाणी अग्निशमन दलही पोहोचल्याची माहिती आहे. या ठिकाणी अजूनही काही पर्यंटक अडकले आहेत, त्यांना वाचवलं जात आहे. या ठिकाणी गर्दी करु नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

Maharashtra Live News Update : दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा ही कमळावर येणार आहे- चंदशेखर बावनकुळे

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

SCROLL FOR NEXT