Nashik Crime : महाराष्ट्रात राजा रघुवंशी प्रकरण, नवऱ्याची हत्या करुन मृतदेह घरात गाडला, अन्...; घटनेनं थरकाप उडाला

Nashik Crime News : यशवंत मोहन ठाकरे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा येथील रहिवासी होते. त्यांच्या पत्नीनेच त्यांची हत्या केली. आपला मुलगा दोन महिन्यांपासून गुजरातमध्ये मजुरीसाठी गेला.
wife killed husband and buries body at home
wife killed husband and buries body at home Saam Tv News
Published On

नाशिक : नाशिकमध्ये एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा येथे एका पत्नीनं आपल्या पतीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. इतकंच नाही, तर तिने त्याचे तुकडे करून ते घरातच पुरले. ही घटना उघडकीस आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची घटना ताजी असतानाच, ही घटना समोर आली आहे.

यशवंत मोहन ठाकरे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा येथील रहिवासी होते. त्यांच्या पत्नीनेच त्यांची हत्या केली. आपला मुलगा दोन महिन्यांपासून गुजरातमध्ये मजुरीसाठी गेला. तो अजूनही परत न आल्याने यशवंतच्या आई-वडिलांनी सुनेकडे विचारणा केली. मात्र, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, सून स्वतः गुजरातच्या बिलीमोरा येथे निघून गेली. त्यामुळे घरच्यांना संशय आला. यशवंत परत न आल्यानं त्यांनी अधिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला. पण काहीच पत्ता लागला नाही. अखेर, यशवंतच्या भावाची पत्नी प्रभाला भेटायला आली. त्यावेळी तिला काहीतरी संशयास्पद वाटलं. तिने ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.

wife killed husband and buries body at home
Mawal Tragedy: मृत्यूचा पूल कसा कोसळला? प्रत्यक्षदर्शींचाही काळजाचा ठोका चुकला; पर्यटक वाचवण्यासाठी ओरडत होते पण..

पोलिसांनी अधिक तपास केला, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. घराच्या शोषखड्ड्यात यशवंतचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी गोणीतील तुकडे असलेला मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी सुरगाणा पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नाशिकमधून ही घटना समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून सदर महिलेने कोणत्या कारणातून आपल्या पतीची हत्या केली, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

wife killed husband and buries body at home
Uddhav Thackeray : मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गटाने कंबर कसली; पक्षप्रमुखांनी शिवसैनिकांना काय संदेश दिला? VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com