सागर आव्हाड, साम टीव्ही
पुण्याच्या मावळमधील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडली आहे. पूल कोसळल्यानंतर २० ते २५ पर्यटक वाहून गेले. यामधील ५ पर्यटकांना वाचवण्यात यश आलं आहे. तर दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झालाय. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची धक्कादायक कारणे समोर आले आहेत. ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी या दुर्घटनेवरून प्रशासनाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवलं आहे.
मावळच्या शेलारवाडी येथील कुंडमळ्यातील इंद्रायणी नदीवरील असलेला लोखंडी पूल कोसळला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले. काही पर्यटकांना रेस्क्यू टीमला वाचवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेत जखमी झलेल्या पर्यटकांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेवरून ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी प्रशासनवार टीका केली.
सुषमा अंधारे म्हणाल्या, 'इंद्रायणी नदीवरील पूल पडण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र ही घटना का घडली याचा शोध घेतला असता, कुंडमळा परिसरातील इंद्रायणीवरचा पूल किंवा एकूणच राज्यातील वेगवेगळ्या नद्यांवर असणारे पूल यांच्या संबंधाने आवश्यक असणारी कामे पावसाळ्याआधी होणे अधिक गरजेचे आहे. अशा मोडकळीस आलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट शासनाकडून होणे गरजेचे आहे. मात्र या पुलाच्या बाबतीत अशी कुठलीही खबरदारी घेतलेली नव्हती'.
'कुंडमळा जवळील ग्रामस्थांनी प्रतिनिधींकडे नवीन पुलाची मागणी केली. तसेच पर्यायी रस्ता उपलब्ध नसतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या दुर्घटनेत गेलेले बळी हे नैसर्गिक बळी नाहीत. तर शासन प्रशासनाचे हलर्गजीपणाचे बळी आहेत, असं अंधारे म्हणाल्या.
दरम्यान, इंद्रायणी नदीवरील कुंडामाळा येथील पूल ३० वर्ष जुना असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भातील फलक या ठिकाणी लावला होता. या पुलाची दुरुस्ती अनेक वेळा करण्यात आली आहे. तरीही त्या ठिकाणाहून वाहने नेण्यात येत होती. तसेच या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती,असेही बोललं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.