Surendra Pathare-Aishwarya Pathare Saam Tv
मुंबई/पुणे

Surendra Pathare-Aishwarya Pathare: बाप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार, लेक अन् सून भाजपचे नगरसेवक; पुण्यात कुटुंब जिंकले

Surendra Pathare-Aishwarya Pathare Husband Wife Win Pune Municipal Election: पुणे आमदाराचे सुपुत्र आणि सुनबाईंनी निवडणूकीत यश मिळवले आहे. सुरेंद्र पठारे आणि ऐश्वर्या पठारे यांनी निवडणूकीत यश मिळवले आहे.

Siddhi Hande

राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात सर्वाधिक महापालिकेत भाजपने सत्ता मिळवली आहे. अनेक ठिकाणी महायुतीनेही विजय मिळवला आहे. दरम्यान, पुण्यात आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव आणि सुनबाईदेखील नगरसेवक झाल्या आहेत. त्यांनी पुणे महापालिकेत विजय मिळवला आहे.

पती-पत्नी दोघेही विजयी (Husband Wife Candidate Win Pune Municipal Election)

पुण्यात सुरेंद्र पठारे आणि पत्नी ऐश्वर्या पठारे यांनी निवडणूक लढवली होती.दोघांचाही विजय झाला आहे. सुरेंद्र पठारे यांचा प्रभाग ४ मधून तर त्यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे यांचा प्रभाग ३ मधून विजय मिळवला आहे. एकाच कुटुंबातील पती-पत्नी दोघेही विजयी झाल्याने कुटुंबियांना आनंद झाला आहे.

बायकोला उचलून घेत आनंद साजरा (Surendra Pathare and wife Aishwarya Pathare Win Election)

सुरेंद्र पठारे आणि ऐश्वर्या पठारे यांचा विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. या दाम्पत्याने पहिल्यांदा भाजपकडून निवडणूक लढवली होती. दोघेही विजयी झाल्यानंतर पत्नीला उचलून घेऊन पती सुरेंद्र पठारे यांनी जल्लोष केला. या दोघांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वडील शरद पवार गटाचे आमदार

सुरेंद्र पठारे हे आमदार बापू पठारे यांचे सुपुत्र आहे. वडगावशेरीतून ते आमदार म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहराचे एकमेव आमदार आहेत. आमदाराच्या मुलाने आणि सुनबाईंची पुणे महापालिकेत वर्णी लागली आहे.

पुणे महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस अन् राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र, या सत्तेला भाजपने सुरुंग लावला आहे. भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेसचा राष्ट्रावादीच्या गेल्या १० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. भाजप जवळपास ८७ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे पुण्यात भाजपचा महापौर होणार हे ठरले आहे. मात्र, अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पुण्यातच निराशा पदरी पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update: अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाचा दणदणीत विजय

Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेचा निकाल लागताच दोन मोठे निर्णय; बिल्डरांचे धाबे दणदणार

महाराष्ट्राच्या राजकारणात MIM ची दमदार एन्ट्री; १२० हून अधिक उमेदवार जिंकल्याचा दावा, काँग्रेसलाही पडले भारी

Celebrity Divorce: प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोडला संसार; 23 महिन्यांनी घेतला काडीमोड

ऐनवेळी प्रभाग बदलला आणि अखेरच्या क्षणी ठाकरेंच्या माजी महापौराचा दणदणीत विजय|VIDEO

SCROLL FOR NEXT