KETAN AGRAWAL MURDER CASE: SIYA GOYAL AND CHETAN CHAUDHARY CONFESS TO KILLING PUNE BUILDER'S SON 
मुंबई/पुणे

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Lohagad Ketan Agrawal Death Case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Akshay Badve

  • सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालच्या हत्येची कबुली दिली.

  • प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी हत्या केल्याचा आरोप आहे.

  • आरोपींनी केतनला लोहगडच्या उंच कड्यावरून ढकलल्याचं समोर आलं.

केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी केतन अग्रवाल यांच्या हत्येची कबुली दिली. या प्रकरणानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. केतनला सियाचा वागणुकीचा अंदाज आला असता आणि वडिलांनी केतनच्या म्हणण्यानुसार विशाल अग्रवाल यांनी सियाची चांगली चौकशी केली असती तर केतन आज जिवंत राहिला असता.

प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतनची हत्या केली. या दोघांनी प्लॅन करून केतनला लोहगडला नेल आणि तेथील एका उंच कड्यावरून खाली ढकलून दिलं. केतनच्या हत्या प्रकरणी बोलताना केतनचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

तर केतन वाचला असता...

केतनने दोन ते ४ वेळा सियाबद्दल चौकशी केली का आहे असा विचारणी केली होती. कारण ती केतनसोबत भांडण करत होती. परंतु आपण त्याला समजवलं होतं. आमच्या चुलत मामा आणि मामी नरेंद्र मित्तल आणि रेणू मित्तल यांनी आम्हाला लग्नाची शाश्वती दिली होती. मुलगी चांगली आहे, घराला व्यवस्थित सांभाळेल, अशी शाश्वती दिली होती. त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि तीच मोठी आयुष्यातली चूक झाली आणि आम्हाला आमचा मुलगा गमवावा लागला. तिच्या विकृतीबद्दल आम्हाला कधी काही संशय वाटला नाही, असं विशाल अग्रवाल म्हणाले.

साप नव्हता तर तिचा प्लॅन होता

पुढे बोलताना विशाल अग्रवाल म्हणाले की, सियाने केतनला मारण्यासाठी आधीही प्रयत्न केला होता. १८ जूनआधीही सिया केतनला लोहगडावरून घेऊन गेली होती, त्यावेळीही तिने केतनला दरीत ढकललं होतं. परंतु केतन हा झुडपांमुळे वाचला. केतनाला काही झालं नाही समजल्यानंतर सियानं साप असल्याचं नाटक केलं. सापापासून वाचवण्यासाठी आपण केतनला धक्का दिल्याचं सिया म्हणाली होती. केतनलाही त्यावर विश्वास झाला. पण आता आमच्या लक्षात आलं की तेथे कुठलाच साप नव्हता सियानेच जाणूनबुजून केतनला धक्का दिला होता. तिची विकृती अशी होती जर देवाने काही गोष्टी समोर आल्या असत्या तर माझा मुलगा वाचला असता.

सियाच्या घरच्यांचीही प्लॅनिंग होती का?

सियाचे बाहेर प्रेम होतं आणि माझ्या मुलावर नव्हतं तर गोष्टीचा उपभोग का घेतला? तिला एकदा पण आम्हाला सांगवसं वाटलं नाही का? तिने १०० टक्के आमचा उपभोग घेतला आनंद लुटला. साखरपुडा झाला होता मनाविरोधात झाला होता तर नाही म्हणायला काय हरकत होती? खून करायची काय गरज होती? दरम्यान केतनच्या हत्येत तिच्या कुटुंबियांची प्लॅनिग होती का हे तपासातून समोर येईल असं विशाल अग्रवाल म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT