HARYANA REWARI MURDER CASE: WIFE, LOVER ACCUSED OF KILLING HUSBAND AND STAGING SUICIDE Saam tv
मुंबई/पुणे

Shocking : लोहगडासारखं हत्याकांड! बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीला संपवलं, चॅट्समुळे पत्नीचा डाव फसला अन्...

Haryana Crime News : हरियाणातील रेवाडी जिल्ह्यात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी पत्नीला अटक केली असून मुख्य आरोपींचा शोध सुरू आहे.

Alisha Khedekar

  • हरियाणातील रेवाडीमध्ये २१ वर्षीय तरुणाची हत्या

  • कॉल रेकॉर्ड्समुळे फुटलं बिंग

  • तपासात पत्नीने प्रियकर आणि साथीदारांसह पतीची हत्या केल्याची माहिती

  • पुरावे नष्ट करण्यासाठी आत्महत्येचा बनाव रचल्याचा आरोप

पुण्यातील केतन अगरवाल प्रकरण आणि इंदूरमधील सोनम रघुवंशी हत्या प्रकरण ताजे असताना आता हरियाणातील रेवाडी जिल्हा धक्कादायक हत्याकांडाने हादरला आहे. पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे या हत्येनंतर पत्नीने पतीच्या आत्महत्येचा बनाव रचला. या घटनेचा तपास पोलीस करत असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जडताल गावातील २१ वर्षीय मोनू हा ८ जून रोजी बेपत्ता झाला होता. त्यानंतर १० जून रोजी त्याचा मृतदेह एका कालव्यात आढळून आला. शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमांच्या खुणा नसल्याने सुरुवातीला पोलिसांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला. घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला.

मात्र, मोनूच्या कुटुंबीयांना या मृत्यूबाबत संशय होता. पोलिसांकडून परत मिळालेल्या मोबाईल फोनमधील सर्व डेटा गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली. फोनमधील डिलीट झालेला डेटा पुन्हा मिळवल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. हत्येच्या दिवशी मोनूने पत्नी तनूला तब्बल ४९ वेळा फोन केला होता, मात्र तिने केवळ एकदाच फोन उचलला होता. या माहितीच्या आधारे कुटुंबीयांनी खुनाचा संशय व्यक्त करत पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली.

अखेर २ जुलै रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला आणि तपासाला वेग आला. चौकशीदरम्यान पत्नी तनूने प्रियकर सोनू आणि इतर दोन साथीदारांसह खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तनूने मोनूला भेटण्याच्या बहाण्याने कालव्याजवळ बोलावले.

आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याचे तोंड आणि नाक दाबून बेशुद्ध केले. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याला कालव्यात बुडवून ठार मारण्यात आले. संशय टाळण्यासाठी त्याची स्कूटर तेथेच उभी करण्यात आली आणि मोबाईलमधील डेटा देखील डिलिट करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी तनू आणि तिचा साथीदार हरिओम यांना अटक केली असून, मुख्य आरोपी प्रियकर सोनूसह आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Modak Recipe : गणरायाच्या नैवेद्यासाठी ५ मिनिटांत बनवा तळणीचे मोदक, १ सोपी ट्रिक वापरली तर कधीच फुटणार नाहीत

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर : आगीतून वाचवले; पण जुळ्या चिमुकल्यांना नियतीने हिरावले

25 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, आज होणार फैसला

Election 2027 : सर्वात मोठी बातमी! यूपीसह ५ राज्यांतील निवडणुकांची तारीख आली समोर; 'या' महिन्यात होणार मतदान?

Heart Attack : 'हे' ४ पदार्थ रक्तवाहिन्या ब्लॉक करतात, हार्ट अटॅकचा धोका वाढवतात; आजपासूनच खाणे टाळा

SCROLL FOR NEXT