Pune Fugewadi suspicious deaths : Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Police: पुणे विषारी दारू प्रकरणात मोठी कारवाई, ३ पोलिस अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; पोलिस दलात खळबळ

Pune Fugewadi suspicious deaths case: पुण्यात विषारी दारुने १५ जणांचा बळी घेतला. या प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली. ३ पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.

Priya More
  • पुणे विषारी दारू प्रकरण अपडेट

  • हडपसरमध्ये ३ पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन

  • पुण्यात विषारी दारुमुळे१५ जणांचा मृत्यू

  • या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे जाण्याची शक्यता

अक्षय बडवे, पुणे

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारु प्यायल्यामुळे आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला तर अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या विषारी दारुकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली.

हडपसर येथील विषारी दारूकांड वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला भोवलं. वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह इतर दोन पोलिस कर्मचाऱ्यांना सुद्धा निलंबित करण्यात आले आहे. घटनेतील निष्काळजीपणा पुणे पोलिसांना भोवला. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले निलंबित झाले आहे. सह पोलिस निरीक्षक हसीना सिकलगार, उपनिरीक्षक हसन मुलानी यांचे देखील निलंबन करण्यात आले.

पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृत्यू झालेल्या सदस्यांच्या कुटुंबियांशी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बातचित केली. सुनेत्रा पवार यांनी पीडित कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला. माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या फोनवरून त्यांनी बातचित केली. घडलेला हा प्रकार धक्कादायक असून तुमच्यासोबत सरकार असल्याची ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली.

पुणे विषारी दारू प्रकरणात दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राहुल क्षीरसागर असं दारू विक्री करणाऱ्या मृत व्यक्तीचे नाव आहे. राहुल क्षीरसागर हा हडपसर परिसरात पांढरे मळा येथे अवैध दारू गुत्ता चालवत होता. राहुल क्षीरसागरवर १३ मे रोजी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये दारू विक्री करतो म्हणून गुन्हा दाखल होता. याच राहुल क्षीरसागरचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

दरम्यान, पुण्यातील विषारी दारूकांड तपास सीआयडी करण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील दारूकांड प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला जाणार आहे. दोन्ही शहरात विषारी दारू प्राशन केल्यामुळे १५ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. पुण्यातील हडपसर तर पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी येथील अनेक जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEETचं नियंत्रण थेट PMOकडे, पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाचेही NTAच्या कारभारावर ताशेरे

राज्यात यंदा कमी पाऊस पडणार? सरासरीच्या केवळ 90 टक्के पावसाचा अंदाज

Raigad: कारने वाहतूक पोलिसासह तिघांना उडवलं, मुंबई-गोवा महामार्गावरील थरारक घटना

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

SCROLL FOR NEXT