धक्कादायक! गुजरातमध्ये विषारी दारू प्यायल्याने २० जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये विषारी दारू प्रकरणी पोलिसांनी आरोपी जयेश याला अटक केली आहे.
Gujarat spurious liquor
Gujarat spurious liquorSaam Tv

अहमदाबाद : गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विषारी दारु प्यायल्याने २० जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) मुख्य आरोपीला अटक केली आहे. गुजरातमधील अहमदाबाद आणि बोटाद जिल्ह्यातील रोजिंद या गावामध्ये विषारी दारू प्यायल्याने अचानक लोकांची तब्येत बिघडली. या घटनेत आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची चौकशी पोलिसांनी (Police) सुरू केली आहे. या चौकशीत मिथेनॉलचा पुरवठा करणारा आरोपी जयेश याला पोलिसांनी अटक केली आहे. आता या घटनेची चौकशी एसआयटीकडून करण्याचे आदेश दिले आहे.

Gujarat spurious liquor
Petrol Diesel: गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करताय? मग आधी पेट्रोल-डिझेलचे दर तपासा

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, अहमदाबाद आणि बोटाद मध्ये २० पेक्षा अधिकांची तब्येत बिघडली होती. या घटनेच्या चौकशीत, ज्यांची तब्येत बिघडली आहे त्यांनी दारू प्यायल्याचे समोर आले. या २० जणांची रसायनयुक्त पदार्थ घेतला होता. तब्येत बिघडल्याने काही जणांना भावनगरमध्ये दाखल केले होते. यानंतर या रुग्णांना एसएफएलचे नमुने घेण्यासाठी गांधीनगरला पाठवण्यात आले. या घटनेच्या तपासात एकूण पाच-सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

Gujarat spurious liquor
सोनिया गांधींची आज पुन्हा ईडीकडून चौकशी, राजघाटासह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा निषेध

यावर आता आरोप-प्रत्यारेप सुरू आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात सरकारवर आरोप केले आहेत. नोटाबंदीनंतरही हे सर्व कसे घडत आहे, हे दुर्दैवी आहे. अशा लोकांना राजकीय राजाश्रय मिळत आहे, याची चौकशी व्हायला हवी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com