प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली
तामिळनाडूतील कल्लाकुरिची येथे विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणात ६० हून अधिकजण गंभीर असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून २०० लिटर विषारी दारू जप्त करण्यात आली आहे.
तपासणीत दारूमध्ये घातक मिथेनॉल आढळून (Tamil Nadu News) आले. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केला आहे. या घटनेत सहभागी असणारे आणि अवैध दारू निर्मिती रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनी जीवितहानीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. राज्यपाल रवी यांनी राजभवनच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर सांगितलं की, कल्लाकुरिचीमध्ये अवैध दारू प्यायल्याने लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून खूप दुःख (Death Due To Liquor)झालंय.
तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यात देशी दारू पिल्यामुळे २५ जणांचा मृत्यू झाला आहे, ६० हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली (Poisonous Liquor) आहे. कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी एमएस प्रशांत यांनी जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेतली. घटनेनंतर एम एस प्रशांत आणि रजत चतुर्वेदी यांची अनुक्रमे कल्लाकुरिची जिल्ह्याचे नवीन जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
सरकारने सांगितलं की, या संदर्भात के. कन्नुकुट्टी याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सुमारे २०० लीटर अवैध दारूमध्ये घातक 'मिथेन' असल्याचे उघड झालं (Death Due To Poisonous Liquor) आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेच्या सखोल तपासासाठी सीबी-सीआयडी तपासाचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर सरकारने कल्लाकुरिचीचे जिल्हा दंडाधिकारी श्रावण कुमार जटावथ यांची बदली केलीय. तर पोलीस अधीक्षक समय सिंह मीना यांना निलंबित करण्यात आलंय. कल्लाकुरिची जिल्ह्यातील दारूबंदी शाखेच्या पोलिसांसह इतर नऊ पोलिसांनाही निलंबित करण्यात आलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.