Heat Stroke Death: छत्रपती संभाजीनगरमध्ये २४ तासांत उष्माघाताचा दुसरा बळी; १७ वर्षीय तरुणीचा झोपेतच मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उष्माघाताने पुन्हा एका तरूणीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उष्माघाताने तरूणीचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar NewsSaam Tv

माधव सावरगावे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमधून उष्माघातासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे.सोयगाव तालुक्यात उष्माघाताचा २४ तासांत दुसरा बळी गेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात १७ वर्षीय युवतीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घोसला येथे घडली आहे. शनिवारी (२५ मे) सायंकाळी चार वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या युवतीचं नाव सुमन सर्जेराव (Heat Stroke Death) पवार आहे, ती सतरा वर्षांची होती. ती शुक्रवारी तिच्या आईसोबत शेतात गेली होती. परंतु शेतात गेल्यावर उन्हामुळे तिला शुक्रवारी संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागलं होतं. रात्री झोपल्यानंतर शनिवारी सकाळी सुमन उठलीच नाही. त्यामुळे तिला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं. रात्री झोपेतच तिचा मृत्यू झालाय.

शनिवारी दुपारी चार वाजता सुमनवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सोयगाव तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी शेतातून घरी आलेल्या शेतकरी प्रकाश तराल (Chhatrapati Sambhajinagar News) पाठोपाठ शनिवारी घोसल्यात १७ वर्षीय युवतीचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. महसूल विभागाने या घटनेची नोंद केली आहे. तालुका आरोग्य विभागाचे पथक घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी सायंकाळी उशिरा घोसला येथे रवाना झालं होतं.

राज्यभरात उष्णतेच्या झळा (Heat Wave) जाणवत आहेत. सोयगाव तालुक्यामध्ये मागील २४ तासांत उष्माघातामुळे सलग दुसरा मृत्यू झाला आहे. शनिवारी मात्र सोयगावमधील तापमानाचा पारा ४४ अंशावर होता. त्यामुळे रस्ते सामसूम झाले आहेत, तर गावागावात शुकशुकाट दिसून येत आहे. सोयगाव तालुक्यातील घोसला गाव जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उष्माघाताने तरूणीचा मृत्यू
Heat Wave Maharashtra: अवकाळीनंतर उकाड्यामुळे बळीराजा संकटात; उष्मघातामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू, लाखोंचं नुकसान

घोसला गावात तापमानाची नोंद विक्रमी झाली आहे. या १७ वर्षीय युवतीचा मृत्यू हा नेमका कशाने झाला? हे सांगता येणं सध्या कठीण आहे. परंतु तिला उष्माघाताच्या त्रासाचे लक्षणे जाणवत (Maharashtra Temprature) होते. त्यामुळे उष्माघातामुळे तिचा मृत्यू झाला असावा असंही संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी सोयगाव तहसील कार्यालयाने या युवतीचा मृत्यूची नोंद घेतली आहे. महसूल विभागाच्या पथकांनी घोसला गावात सायंकाळी उशिरा भेट दिल्याची माहिती मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उष्माघाताने तरूणीचा मृत्यू
Heat Wave : भंडारा जिल्हात पारा 43 अंशांवर; घराबाहेर पडणंही झालं मुश्किल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com