Heat Wave Maharashtra: अवकाळीनंतर उकाड्यामुळे बळीराजा संकटात; उष्मघातामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू, लाखोंचं नुकसान

Chickens Died Due To Heatstroke In Sangli: राज्यात उष्णतेमुळे सगळेच हैराण झाले आहेत. आता उष्माघातामुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
उष्मघातामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू
Heat Wave MaharashtraSaam Tv

विजय पाटील, साम टीव्ही सांगली

पावसाळा तोंडावर आलाय परंतु उष्णता काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. उकाड्यामुळे सगळेच हैराण झाले आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात उष्णतेचा त्रास जाणवत आहे. या उष्माघाताच्या झळा आता बळीराजाला बसत आहत. कारण उष्माघातामुळे जनावरं, पक्षी यांचा देखील मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे. सांगलीत उष्मघातामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील (Heat Wave Maharashtra) पलूस तालुक्यातील आंधळी येथील सीताराम भगवान जाधव यांचं पॉल्ट्री फार्म आहे. त्यांच्या ब्रॉयलर कोंबड्यांच्या शेडमधील एकूण ४२०० पक्ष्यांपैकी १२०० कोंबड्यांचा उष्माघातामुळे एकाच दिवसात मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. अगोदरच अवकाळीमुळे शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता जोडधंद्याला देखील उष्णतेचे ग्रहण लागल्याचं दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळाल्याची स्थिती झाली (Chickens Died Due To Heatstroke) आहे.

आता वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आल्याचं चित्र आहे. मंगळवारी भर दुपारी अचानकपणे लोडशेडिंग झालं. त्यामुळे उष्णतेचं प्रमाण (Heatstroke) वाढलं आणि अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे परिसरातील सर्व ब्रॉयलर कोंबडी शेडधारकांचे धाबे दणाणले आहेत. कोंबड्यांचे संगोपन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागणार असल्याचं यावेळी अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं आहे.

उष्मघातामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू
Pune Heat Wave: पुण्यात उन्हाचे चटके असह्य; उष्माघाताने तहानल्या, पाण्यातून विषबाधा झाल्यानं शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू

शेतकरी शेतीला पर्याय म्हणून अनेक शेतकरी जोडव्यवसाय म्हणून पशु आणि कुक्कुटपालन करतात. अवेळी पडणारा पाऊस, वातावरण बदलामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला (Sangli News) आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांला बसत आहे. यापूर्वी देखील उष्मघातामुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता वाढत्या उन्हाचा परिणाम पोल्ट्रीफार्मवर होत आहे. कोंबड्यांच्या मृत्युमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

उष्मघातामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू
Heat Wave Alert : दिल्लीकरांवर सूर्य कोपला, १४ वर्षांचा तापमानाचा रेकॉर्ड तुटला; ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com