जो दारू पिणार, तो मरणारच; विषारी दारूचे ३८ बळी गेल्यानंतर CM नितीश कुमार यांचे वक्तव्य

Nitish Kumar Update : दारूबंदी असलेल्या बिहारच्या सारणमध्ये विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.
Bihar CM Nitish Kumar/file
Bihar CM Nitish Kumar/fileSAAM TV

Nitish Kumar Update : दारूबंदी असलेल्या बिहारच्या सारणमध्ये विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. विरोधी पक्ष भाजपने या मुद्द्यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी नितीश कुमार यांनी विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना एक वक्तव्य केले आहे.

जो बनावट दारू पिणार, तो मरणारच. लोकांना स्वतःच सावध राहायला हवं, असं नितीशकुमार म्हणाले. काही लोक काय करू शकतात. काही जण चुका करतातच. जो दारू पिणार तो मरणारच, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

Bihar CM Nitish Kumar/file
नितीश कुमार आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दोन मराठी नेते मैदानात; भाजपने आखली नवी रणनीती

नितीश कुमार म्हणाले की, 'जेव्हा बिहारमध्ये दारूबंदी केली नव्हती, त्यावेळीही लोक विषारी दारू पिऊन मरत होते. इतकेच काय तर अन्य राज्यांतही अशा प्रकारच्या घटना घडत होत्या. लोकांनाच आता सावध राहायला हवं. बिहारमध्ये दारूबंदी आहे. त्यामुळे काही ना काही बनावट विकलं जाणारच. बनावट दारू पिऊन लोकांचा मृत्यू झाला. दारू पिणं ही वाईट सवय आहे, दारूचे व्यसन करू नये.' (Nitish Kumar)

Bihar CM Nitish Kumar/file
VIDEO : लालबागमधील टोलेजंग इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

विषारी दारू पिऊन ३८ जणांचा बळी गेल्यानंतर बिहारमधील नितीशकुमार सरकारला घेरलं जात आहे. त्यावर नितीशकुमार यांनी संताप व्यक्त केला आहे. गरिबांना पकडू नका, जे दारूचा व्यवसाय करतात अशा लोकांना पकडा, असं मी अधिकाऱ्यांना सांगितल्याचे नितीशकुमार म्हणाले. दारूबंदी कायद्यामुळं अनेकांचा फायदा झाला आहे. काहींनी तर दारू पिणे सोडून दिले आहे. दारूशी संबंधित कुठलाच व्यवसाय करू नका, गरज वाटली तर, सरकार दुसऱ्या कोणत्या उद्योगासाठी एक लाखांपर्यंतची रक्कम देण्यास तयार आहे, असं आवाहनही नितीशकुमार यांनी केलं.

सारणमध्ये विषारी दारूचे ३८ बळी

दरम्यान, बिहारमधील सारणच्या इसुआपूर आणि मशरक पोलीस ठाण्याच्या हद्दीत कथितरित्या विषारी दारू पिऊन ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, दारू प्यायल्याने मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे प्रशासनानं यावर चुप्पी साधलीय. आणखी काही जण रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत, अशी माहिती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com