Mumbai Lalbaug Building Fire
Mumbai Lalbaug Building Fire Saam TV

VIDEO : लालबागमधील टोलेजंग इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

लालगबागमधील अविघ्न पार्क या टोलेजंग इमारतीला पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे.
Published on

Mumbai Lalbaug Building Fire : लालगबागमधील अविघ्न पार्क या टोलेजंग इमारतीला पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. इमारतीच्या २२ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब रवाना झाले आहेत. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ही आग लागली असून आगीचे लोट दूरपर्यंत दिसून येत आहे.  (Latest Marathi News)

Mumbai Lalbaug Building Fire
Gram Panchayat Election : पत्नीचा निवडणूक प्रचार करताना पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू; मन हेलावून टाकणारी घटना

आगीनंतर इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर काढलं जात आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. याआधी सुद्धा अविघ्न पार्क इमारतीमध्ये आग लागली होती. १९ व्या मजल्यावर लागलेली ही आग विझवताना अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते.

मुंबईतील लालबाग परिसरात ही एकूण 60 मजल्यांची गगनचुंबी इमारत आहे. तर इमारतीच्या आजूबाजूला इतर लहान-मोठ्या इमारतीही आहेत. त्याशिवाय अनेक बैठी घरं, चाळीही आहेत. मध्य रेल्वेवरील करी रोड स्टेशनच्या अगदी बाजूलाच ही इमारत आहे. दरम्यान, अग्निशमक दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आल्याची माहिती आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com