Gram Panchayat Election : पत्नीचा निवडणूक प्रचार करताना पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू; मन हेलावून टाकणारी घटना

ग्रामपंचायत निवडणुकीत पत्नीच्या सरपंचपदाचा प्रचार करत असताना पतीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला
Latur Gram Panchayat Election
Latur Gram Panchayat ElectionSaam Tv

Latur Gram Panchayat Election 2022 : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी गावकऱ्यांची धावपळ सुरू आहे. अशातच, ग्रामपंचायत निवडणुकीत पत्नीच्या सरपंचपदाचा प्रचार करत असताना पतीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना लातूर जिल्ह्यातील मुरुड परिसरात घडली आहे. (Latest Marathi News)

Latur Gram Panchayat Election
Crime News : पत्नीचे मावस भावासोबत अनैतिक संबंध; पतीला कळताच घडलं भयंकर

अमर पुंडलिक नाडे (वय 45 वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, अमर यांच्या पत्नी अमृता नाडे या मुरूड (Latur) ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. गुरूवारी अमृता यांच्या प्रचारार्थ मुरुड शहरातील सार्वजनिक चौकात त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

दरम्यान, प्रचाराची (Gram Panchayat) जाहीर सभा सुरू असताना अमर नाडे यांनी भाषण सुरू केलं. मात्र, भाषण करत असताना अचानक ते स्टेजवर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अमर यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. अमर यांच्या अचानक निधनाने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Latur Gram Panchayat Election
Aurangabad Crime : २२ वर्षीय मुलीसोबत मांत्रिकाचं क्रूर कृत्य; धक्कादायक घटनेनं औरंगाबादेत खळबळ

लातूर जिल्ह्यात निवडणुकांची रणधुमाळी

लातूर जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. जिल्ह्यातील 351 पैकी 337 ग्रामपंचायत निवडणूकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. यातील 14 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत. आतापर्यंत 16 सरपंच व 399 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. सर्व स्तरावर ग्रामपचायत सदस्यांना मतदानासाठी आकर्षित करण्यासाठी उमेदवार प्रचार करत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com